मुलांनी क्रांतीकारकाचे विचार आत्मसात करावे- अर्जुनराव गालफाडे
औरंगाबाद : वाळूज महानगरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहांमध्ये आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 227 व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अर्जुनराव गालफाडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ,
आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी आपले उभे आयुष्य देशासाठी घातले. जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी. हे ब्रीद वाक्य ठेवून वासुदेव बळवंत फडके लोकमान्य गंगाधर टिळक शहीद भगतसिंग अशा थोर क्रांतिकारकांना दांडपट्टा भालाफेक तलवारबाजी आदी प्रकारचे प्रशिक्षण देऊन इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार केले होते. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले हे स्त्री शिक्षणाची द्वारे खुली करत असताना सनातनी वृत्तीच्या लोकांनी त्यांना त्रास देणे सुरू केले असताना वीर लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांचे संरक्षण करून त्यांच्या कार्यास मदत केली म्हणूनच सावित्रीबाईंना स्त्री शिक्षणाचे पवित्र कार्य पार पाडता आले . अशा क्रांतीकारकाचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात केले पाहिजेत असे गालफाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे प्रदेश महासचिव मारुती गायकवाड, जिल्हाध्यक्ष विलास सौदागर, मंडळाचे सचिव पांडुरंग बारस्कर, ज्येष्ठ नेते मच्छिंद्र पुलावळे, सूर्यकांत नवगिरे ,परमेश्वर सगट, कराटे क्लास चे प्रशिक्षक , सरपंच गजानन बोंबले पाटील, गणेश ठोकळ, गणेश साबळे , कृष्णा काजळे व कार्यकर्ते न्यानेश्वर साखरे यांची उपस्थिती होती
प्रतिनिधी:- अनिकेत घोडके,
NTV न्युज मराठी, वाळूज औरंगाबाद.