औरंगाबाद येथे बिडबायपास रोड येथे महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद या सामाजिक संघटना च्या वतीने महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परीषद कार्यालयामधे औरंगाबाद या ठीकाणी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अफसर तडवी यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या विषयी त्यांनी आपल्या देशासाठी समाजासाठी काय काय काम कार्य केले या संदर्भामधे माहिती सांगीतली तसेच महंमद तडवी यांनी बिरसा मुंडा यांच्या विषयी माहिती देऊन भाषण केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी , उपाध्यक्ष शमा सरदार बरडे , सचिव मोहम्मद दगडू तडवी , सहसचिव बाबू सुलेमान तडवी , कोषाध्यक्ष सांडू चिंधा तडवी , सल्लागार डॉ. सरदार भिकन बरडे, समीर बाबू तडवी , शहराध्यक्ष, संदिप एस तडवी, आश्रफ तडवी, यांच्यासह आदिवासी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद