विनोद गोडबोले नागपूर
🛑महाराष्ट्रमध्ये मागील दिवसापासुन बंदुकीने गोळी फायर करून भरपुर गुन्हे घडलेले असल्याने नागपुर ग्रामीण येथील मा. पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार साहेब यांनी नागपुर ग्रामीण जिल्हयातील उपविभागिय पोलीस अधिकारी व सर्व ठाणेदार यांना आर्म अॅक्टची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी करून नागपुर ग्रामीण पोलीसांनी वेगवेगळ्या पो.स्टे. अंतर्गत कोबीग ऑपरेशन करून रेर्काड वरील आरोपीना चेक केले त्याच दरम्यान पोलीस उपविभागिय अधिकारी संतोष गायकवाड व ठाणेदार अरविंदकुमार कतलाम पोलीस स्टेशन खापरखेडा यांनी आर्म अॅक्टची कारवाई करिता एक पथक तयार करून त्या पथकाला आर्म अॅक्टची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्याअनुसंघाने पोलीस स्टेशन खापरखेडयाचे डी.बी पथक यांना दिनांक 07/09/2024 रोजी गुप्तसुत्राव्दारे माहीती मिळाली की आशिष विजय शास्त्री वय 23 वर्ष रा. दहेगाव रंगारी यांचेकडे देशी माउझर आहे अश्या माहीतीवरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथील डी बी पथकाने आशिष शास्त्री यास ताब्यात घेऊन सविस्तर विचारपुस केले असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्यास सखोल विचारपुस केली असता त्याने कबुल केले की माझाकडे एक देशी लोखंडी माउझर आहे व ती मी माझा घरी लपवुन ठेवलेली आहे अशी कबुली दिल्याने पो.स्टे खापरखेडयाचे अधिकारी व डी बी पथक हे दहेगाव रंगारी वार्ड क 4 येथे आरोपी आशिष शास्त्री यांचे सोबत त्याने सांगितल्याप्रमाणे पंचासह आरोपीच्या घरी गेलो असता आशिष शास्त्री याने त्याचे घरा बाजुला असलेल्या गोठ्यातुन टिनेच्या खाली गाडुन ठेवलेली एक देशी बनावटी लोखंडी स्टील धातुची माउझर काढुन दिली व माउझर चे मॅग्झीगमध्ये 4 जिवंत काडतुस मिळुन आल्याने आरोपीचा ताब्यातुन एक देशी बनावटी लोखंडी स्टील धातुची माउझर कि. 50,000 चा व 4 जिवंत काडतुस किमंत 4000 रू चा असा एकुण 54000 / रू. माल जप्त करून आरोपीविरूध्द कलम 3/25 भाहका सहकलम 135 मपोका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला

🛑सदर कार्यवाही मा. पोलीस हर्ष पोद्दार सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ सा., उपविभागिय पोलीस अधिक्षक संतोष गायकवाड सा. यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार अरविंदकुमार कातलाम सा. सपोनि अमरदिप खाडे, सपोनि स्वाती यावले, पोउपनि आरती नरोटे, डी.बी. पथक येथील प्रफुल राठोड, शैलेश यादव, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने राजु भोयर, राजकुमार सातुर, आनंद देवकते, अमोल लोहकरे यांचे पथकाने पार पाडली आहे.