ओबीसी आरक्षण बच्यावासाठी अहमदपूर येथे ओबीसी, अल्पसंख्याक, दलित समाजाचा महायल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज बांधवांची आज एक व्यापक बैठक नुकतीच संपन्न झाल्यानंतर आज शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथे पत्रकार पत्रकार घेऊन मेळाव्याची घोषणा सर्व पक्षीय सकल ओबीसी बांधवांनी केली. येत्या 18 सप्टेंबर रोजी स. 11 वाजता अहमदपूर शहरातील मेनरोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सदरील मेळाव्याला ओबीसी समाजाचे योद्धे प्रा. लक्ष्मण हाके सर , नवनाथ आबा वाघमारे व शबीर अन्सारी हे संबोधीत करणार आहेत. सदरील मेळाव्या संदर्भातील शासकीय विश्रामगृह अहमदपूर येथील पत्रकार परिषदेस माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके पाटील, एन. आर. पाटील, अॅड. भारत चामे, डॉ. नरसिंह भिकाणे, सुरेश मुंडे,राजेंद्र वनारसे, माधवराव भिंगोले,गोविंद गिरी, बालाजी गुट्टे, हणमंत देवकते, रामानंद मुंडे यांच्या सह अहमदपूर व चाकूर तालुक्यातील ओबीसी , अल्पसंख्याक समाज बांधव पत्रकार परिषदेस उपस्थित होते. सदरील ओबीसी अल्पसंख्याक, दलित समाजाचा मेळावा घेण्या संदर्भात अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सकल ओबीसी, अल्पसंख्याक समाज बांधवांची एक व्यापक बैठक अहमदपूर ते शिरुर ता. रोडवरील क्राइस्ट इंग्लिश स्कूल मध्ये घेण्यात आली होती सदरील बैठकीस माजी आमदार बब्रुवान खंदाडे, गणेश दादा हाके पाटील,डॉ.अशोक सांगवीकर, एन. आर. पाटील, भारत रेड्डी,जिवणकुमार मद्देवाड, डॉ. नरसिंह भिकाणे, बालाजी रेड्डी, भारत चामे, किशोर मुंडे, त्रंबक आबा गुट्टे, अशोक केंद्रे, चंद्रकांत मद्दे,अॅड. माधवराव कोळगावे,सुरेश मुंडे, भालचंद्र चाटे,वसंत डिगोळे,माधवराव भिंगोले, ज्ञानोबा बडगिरे, कलीमोदीन अहमद, गोविंद गिरी, नितीन रेड्डी,बालाजी गुट्टे, अंकुश जनवाडे,मधुकर मुंडे, हणमंत देवकते, माणीक नरवटे, रामानंद मुंडे यांच्या सह अहमदपूर व चाकूर तालुक्यातील ओबीसी व अल्पसंख्याक समाज बांधव मोठ्या संख्येने सदरील बैठकीस उपस्थित होते.