सचिन बिद्री-उमरगा-उस्मानाबाद
उमरगा– आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या संकल्पनेतुन त्यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने व उमरगा तालुका शिक्षक व सेवकांची पतसंस्था यांच्या सहकार्याने उमरगा येथील शिक्षक पतसंस्था कॉम्प्लेक्समध्ये उभारण्यात आलेल्या सुसज्ज व अद्ययावत अशा ज्ञानज्योती अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा वाचनालयाचा मा.खा.प्रा.रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.यावेळी बोलताना मा. खा. रवींद्र गायकवाड यांनी म्हणाले की,”ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवक-युवतींसाठी ही अभ्यासिका अत्यंत लाभदायक ठरणार असून, विद्यार्थ्यांनी या अभ्यासिकेच्या माध्यमातून उत्तम तयारी करावी व येथून जास्तीत-जास्त अधिकारी निर्माण व्हावेत असे आव्हानही केले.

उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार तथा ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आमदार ज्ञानराज चौगुले, यांनी यावेळी बोलताना, मतदारसंघातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही मोफत अभ्यासिका सुरू केली असून पुढील काळात सुद्धा अनेक शैक्षणिक उपक्रम व्यापक स्वरूपात राबविणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्रजी शिंदे, युवा नेते किरण गायकवाड, सभापती मोहयोद्दीन सुलतान, तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, उप विभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन इब्राहिम चौधरी, शिक्षक समितीचे मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष शिवाजी कावळे, डॉ.उदय मोरे, डॉ.राम जाधव, प्रमुख उपस्थिती यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, माजी नगराध्यक्ष रजाक अत्तार, नगरसेवक संतोष सगर, पंढरीनाथ कोणे, ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे सचिव प्रदीप मदने, संचालक विजय वडदरे, धनराज देशमुख, अमर देशटवार, बाजार समितीचे संचालक हणमंत डावरगे, सचिन जाधव, बालाजी जाधव, उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, शिवसेना विधानसभा अध्यक्ष शरद पवार, योगेश तपसाळे, गोपाळ जाधव , विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले,शिक्षक पतसंस्थेच्या उपाध्यक्ष कमलताई जोगे, सचिव शांताराम गायकवाड, शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बनसोडे, संचालक बिभीषण सुरवसे, व सर्व संचालक मंडळ, कमलाकर मोटे, शिक्षकवृंद, खयूम चाकूरे, शरद इंगळे, जगन पाटील, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, शिक्षक प्रवीण स्वामी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन इब्राहिम चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन शिवमूर्ती स्वामी, किशोर गायकवाड यांनी आणि आभार प्रदर्शन शांताराम गायकवाड यांनी केले.