उस्मानाबाद :- शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी उस्मानाबाद जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण व कामगार राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांची शिवा संघटनेच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड झाली आहे.
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचा पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव यांचा २६वा वर्धापन दिन बीड जिल्ह्यातील संत शिरोमणि मनमत स्वामी यांच्या पवित्रस्थळी (कपिलधार) येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. या मेळाव्यात सातलिंग स्वामी यांची शिवा संघटनेच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी केली. धोंडे यांनी निवडीची घोषणा करताच पदाधिकारी ,कार्यकर्ते व समाज बांधवांनी टाळ्यांच्या गजरात सातलिंग स्वामी यांचे अभिनंदन केले. यावेळी संघटनेच्या वतीने स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. सातलिंग स्वामी हे संघटनेच्या स्थापनेपासून संघटनेत क्रियाशील असून , त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन सरचिटणीसपदी त्यांना बढती मिळाली आहे. त्यांच्या निवडीने महाराष्ट्रात संघटना वाढीसाठी मदत होणार आहे.
यावेळी शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे, गुरुवर्य धारेश्वर महाराज, गुरुवर्य प्रभूदेव महाराज माढेकर, गुरुवर्य शिवानंद महाराज तमलूरकर, गुरुवर्य बेटमोगरेकर महाराज, गुरुवर्य विरुपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज, गुरुवर्य शिवहर महाराज आळणे, अहमदपूर मठाचे मठाधिपती गुरुराज महाराज , शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभय कल्लवार, राष्ट्रीय सरचिटणीस उमाकांत शेटे, बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, विठ्ठलराव ताककिडे, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सुरेंद्र डोके, ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे आदीसह राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी, विविध राज्यातून आलेले कार्यकर्ते, विविध राज्यातून आलेले समाज बांधव उपस्थित होते.
सचिन बिद्री उमरगा