उस्मानाबाद : 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी किरण सगर बोलत होते. अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे तर प्रमुख उपस्थिती मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांची होती. यावेळी बोलताना प्राध्यापक किरण सगर म्हणाले की भारतीय संविधानाने देशाला स्वावलंबन ,जातिभेद, अनिष्ट रूढी परंपरा घालवून स्वतंत्र पणे जगण्याचा अधिकार दिला. मनुस्मृतीची पद्धत बंद होऊन विद्वान व गुणवत्तेला न्याय मिळाला .अन्याय अत्याचार नाहीसा होऊन थोर समाजसेवकाच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात उमटले आहे.
मानव जातीच्या कल्याणासाठी संविधान तयार झालेले असून संविधानामुळे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य मिळाले .थोर समाजसेवकाच्या अथक प्रयत्नातून संविधानाची निर्मिती झाली आहे. आपण आपल्या देशात पारायण महाभारत पोथी पुराण याचे वाचन करतो पण प्रत्यक्षात आज संविधान पुस्तिकेचे पारायण देशात होण्याची गरज आहे. यावेळी इयत्ता पाचवी स्कॉलरशिप मध्ये पात्र झालेल्या रोहन केदारे 212 श्रेयशी शिंदे 202 विठ्ठल पवार 180 या गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक संजय रुपाजी, शिल्पा चंदनशिवे, सोनाली मुसळे, आणि अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीचे ऑनलाइन काम उत्कृष्टपणे केलेले रिटेल शिक्षक पटेल एफ. एम. यांचाही यावेळी पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेतील शिक्षक बाबासाहेब जाधव, बशीर शेख, धनराज तेलंग, चंद्रशेखर पाटील, सदानंद कुंभार ,ममता गायकवाड, शुभांगी पवार इत्यादींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतीक विभाग प्रमुख सरिता उपासे प्रास्ताविक मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर आभार बलभीम चव्हाण यांनी मांडले कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सचिन बिद्री उमरगा