उस्मानाबाद : कोरोना काळात ज्या परिवारावरातील सदस्य/ घरचा कर्ता पुरुष गमवावा लागला आहे,अश्या विधवा महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी..महाराष्ट्र शासन कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य तर्फे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे
मेळाव्याला येताना महत्वाचे कागदपत्र (मृत्यू प्रमाणपत्र/आधार कार्ड/के वाय सी/इतर कागदपत्र) घेऊन यावे असे आव्हाहन समिती तर्फे विजय जाधव यांनी केले आहे.
कोरोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल्या मायतांच्या कुटुंबियांना आधार देणारा सदर मेळावा,उमरगा पंचायत समिती सभागृह..दिनांक 29 नोव्हेंबर, वेळ सकाळी साडे दहा वाजता (10.30am) ला सुरू होणार आहे.
*मेळाव्याची उद्दिष्टे*
- शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती देत विकासाच्या दृष्टीने पाऊल उचलणे..!
- उपस्थित सर्व विधवा महिलांचे प्रश्न ऐकून त्यावर सविस्तर चर्चा करून विधवा महिलांच्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने एक खिडकी योजनेच्या माध्यमातून तत्परतेने योजना लागू करणे..
- उमरगा तालुक्यातील विधवा महिलांची यादी तयार करून कोरोनाच्या संकट काळात आघात झालेल्या कुटुंबाला आधार देण्याचा उमरगा प्रशासन व कोरोना एकल महिला पुर्नवसन समिती उमरगा शाखेचा हा उपक्रम असून शासकीय योजना अंमलात अनन्याहेतू विधवांची यादी तयार होणार आहे.
सचिन बिद्री, उमरगा-उस्मानाबाद