एकल महिलांचे पुनर्वसनासाठी प्रशासन सज्ज, विविध योजना लागू होणार-पाटील
उस्मानाबाद : उमरगा (सचिन बिद्री) मिशन वात्सल्य व कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने एकल विधवा महिलांचा मेळावा आयोजित करून विधवांना तत्परतेने शासकीय मदत मिळवून देण्यात उमरगा तहसीलदार राहुल पाटील वेळोवेळी पाठपुरावा करत आहेत दरम्यान कोणी लाचेची मागणी(डिमांड)केल्यास कठोर कार्यवाही करू असे एन टी व्ही न्युज मराठीशी बोलताना श्री राहुल पाटील यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी उमरगा पंचायत समितीच्या सभागृहात कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांचा मेळावा घेत स्त्री सक्ष्मीकरणाचा हेतू समोर ठेवत उपस्थित शेकडो महिलांना मार्गदर्शन करण्यात आले होते.
उमरगा तालुका मिशन वात्सल्य व एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने शहरी व ग्रामीण भागातील कोरोना काळात वैधव्य आलेल्या एकल महिलांचा मेळावा महिलांचे सर्वेक्षण करून माहिती संकलित करण्यात आली असून शासनाच्या नियमानुसार पन्नास हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य या प्रत्येकी महिलांना होणार आहे. पण दरम्यान या पन्नास हजार च्या मोबदल्यात काही लाच मागण्यांबाबत तोंडी तक्रारी तहसीलदारांच्या दालनापर्यंत आल्या त्यामुळे तहसीलदार राहुल पाटील यांनी सर्व जनतेस आवाहन केले आहे की शासकीय योजना तथा लाभ प्राप्त करून घेताना जर कोणी लाच मागत असेल तर निर्भीडपणे उमरगा तहसीलदार कार्यालय गाठून तक्रार नोंदवावी,तक्रार नोंदविणे आपणास त्रासदायक वाटत असेल तर तोंडी कळवावे, लाच मागणाऱ्या/स्वीकारणाऱ्या व्यक्तीची गय केली जाणार नाही..!
तहसीलदार राहुल पाटील यांच्या या भूमिकेतून प्रांजळ व उदात्त भावना स्पष्ट होत आहेत तर श्री पाटील यांच्या या आवाहाणामुळे वंचित घटकांना मोठा धीर लाभला आहे.एकल महिलांची यादी संकलन करणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती, एकल महिलांच्या समस्या व प्रश्न जाणून घेत त्यावर मार्गदर्शन करन्याचे कार्य उमरगा तहसील कार्यालयाअंतर्गत युद्ध पातळीवर चालू असून, एकल महिलांनी सर्व आवश्यक कागदपत्रे लवकरात लवकर सेतू/ग्रामपंचायत कार्यालय/इ सेवा केंद्र आदी ठिकाणी ऑनलाइन जमा करावी, शासणाच्या विविध योजनेचा लाभ घेऊन आपला विकास साधावा विविध विभागातील अधिकारी आपल्याला मदत करण्यासाठी धडपडत आहेत त्याना सहकार्य करून आपली प्रगती साध्य करावी.असेही तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले आहे.