लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंतीनिमित्त गुणवंतांचा सत्कारस्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी बहुजन समाजाला एकसंघ करून संघर्ष करण्यास सक्षम केले–मुख्याधिकारी जाधवर
(सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद)
उस्मानाबाद : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी बहुजन समाजाला एकसंघ करून संघर्ष करण्यास सक्षम केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आपली अखंड एकता आणि एकात्मता महत्त्वाची आहे.’असे विचार उमरगा नगर परिषदचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी व्यक्त केले.

लोकनेते, बहुजनांचे आधारस्तंभ स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची ७२ वी जयंती व गुणवंतांचा सत्कार समारंभ वंजारी सेवा संघ उमरगाच्या वतीने रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी,शासकीय विश्रामगृह उमरगा, येथे सकाळी १० वाजता संपन्न झाला.या कार्यक्रमात मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून कासारशिरशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवणनाथ डमाले होते. या कार्यक्रमात डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे कर्णधार म्हणून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शरद बडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी वंजारी समाज सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख प्रा.गुणवंत जाधवर, उमरगा तालुकाध्यक्ष सुनील बडे,सचिव प्रा दिलीप घुले,प्रा जनार्दन दराडे,अतिरिक्त वनपरिमंडळ अधिकारी तुकाराम डिगोळे,न.प.अभियंता रवि सोनवणे, विद्युत अभियंता शिवराज दहिफळे,संजीव केंद्रे,अभियंता विकास जाधवर,बालाजी घुले, पोलीस कॉन्स्टेबल विष्णु मुंडे,प्रताप बांगर,संभाजी घुले,लोककेंद्रे,अशोक जाधवर,बाळाजी सोनवणे, डिंगम्बर केदार,सुग्रीव केंद्रे,गोविंद मुंडे,संतोष खाडे,रमेश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा गुणवंत जाधवर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा दिलीप घुले यांनी केले.