अडचणींच्या काळात हाक द्या-बाळासाहेब वाघमारे संस्थापक अध्यक्ष जि एम ग्रुप सोलापूर
उस्मानाबाद : हैद्राबादहुन सोलापूरला जाताना जि एम ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे व पदाधिकारी यांनी उमरगा येथील वंचित बहुजन आघाडीचे नेते राम गायकवाड यांची धावती भेट घेतली यावेळी राजकिय घडामोडीवर चर्चा रंगली असताना “कसल्याही प्रकारची अडचण असो आठवण करा,हाक द्या, जि एम ग्रुप आपल्या सहकार्यासाठी तत्पर राहील असे असे म्हणत वंचितांच्या अडचणी सोडवणे हाच संकल्प आहे असे जि एम ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी उमरगा वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना म्हणाले.

जी.एम.मागासवर्गीय बहुउद्देशिय संस्थाचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे हे सोलापूर महानगर पालिकेचे मा. नगरसेवक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर म्हणून ओळखले जातात.

दरम्यान उमरगा वंचित आघाडीच्या वतीने फेटा बांधून शॉल श्रीफळ देत सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कामगार नेते उमेश मामड्याल, सामाजीक कार्यकर्ते बाली मंडेपु,मा.ब्रम्हाजी निकंबे,पप्पु भैय्या गायकवाड आदींचा सत्कार संपन्न झाला. या वेळी राम गायकवाड यांच्यासह येनेगुर फेस्टिवलचे प्रदिप मदने,बाबुराव गायकवाड,युनूस सौदागर, उमाजि गायकवाड, राघवेन्द्र गावडे आदी उपस्थित होते.
सचिन बिद्री:उमरगा-उस्मानाबाद