उस्मानाबाद : सलाम मुबंई फाउंडेशनच्या वतीने आयोजित बाल परिषदेसाठी उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामलिंग नगर येथील अमृता शरद शेळके व अनुष्का पृथ्वीराज शिंदे दोन विद्यार्थिनींची तर मार्गदर्शक शिक्षक म्हणून संतोष बाबासाहेब मुळे यांची निवड करण्यात आली


सलाम मुबंई फाउंडेशन ने राज्यातील 23 जिल्हांसाठी आयोजित केलेल्या बाल परिषदेत विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य कौशल्य शाळा स्थळावरील बाल पंचायत भूमिका व जबाबदारी अशा अनेक विषयावर प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच देशातील व्यसनाधीनतेचे प्रमाण व त्याचे दुष्परिणाम याची माहिती सांगण्यात येणार आहे परिषदेसाठी उस्मानाबाद सह23 जिल्हाची निवड होणार आहे यात विद्यार्थ्यांना तज्ञ मार्गदर्शन यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित करण्यात येणार आहे त्यांच्याकडून नवीन बदलाची अपेक्षा केली जाणार आहे या परिषदेसाठी विद्यार्थिनीची निवड झाल्याबद्दल विस्ताराधिकारी श्री प्रकाश पारवे साहेब. केंद्रप्रमुख नागटिळ साहेब. मुख्याध्यापक टेकाळे मॅडम.तसेच शालेय व्यावस्थापन समिती ग्रामस्थाच्या वतिने अभिनंदन केले आहे
प्रतिनिधी रफिक पटेल येडशी उस्मानाबाद