मुखेड शहरातील जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगराध्यक्ष प्रतिनिधी डॉ. अतुल देबडवार आणि शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूरकर यांनी थेट शालेय शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

मुखेड शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी मुखेड नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा नगरसेवक डॉ. अतुल देबडवार आणि शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूरकर यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षणमंत्री मा. ना. दादाजी भुसे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

शहरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोषक शैक्षणिक वातावरण मिळण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध असणे गरजेचे आहे. शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव दूर करून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने तातडीने लक्ष देऊन आवश्यक निधी व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य देत मुखेड शहरातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित शिक्षण विभागाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही डॉ. अतुल देबडवार आणि बालाजी पाटील कबनूरकर यांनी व्यक्त केली आहे.

सय्यद मुजीब | एनटीव्ही न्यूज मराठी | मुखेड, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *