🛑ग्रामस्थांकडून पोलिसांच्या कार्य तत्परतेचे कौतुक

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मोठी व्यापारी बाजारपेठ असलेल्या तिसगाव या ठिकाणी चार दिवसापूर्वी मच्छिंद्र ससाने यांच्या वस्तीवर दरोडा टाकून त्यांना चोरट्याकडून झालेल्या मारहाणीमध्ये ससाणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.त्यानंतर तिसगाव  ग्रामस्थांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्या नेतृत्वाखाली रविवारी कडकडीत बंद पाळून निषेध मोर्चा काढून या घडलेल्या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला.यावेळी माजी मंत्री कर्डिले यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना संपर्क साधून तिसगावच्या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात यावा व दोन दिवसात या घटनेतील आरोपींना अटक करावी अशी मागणी केली.

त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,उपाधीक्षक प्रशांत खैरे,डीवायएसपी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 48 तासांमध्येच आरोपी निष्पन्न करून या गुन्ह्यातील दहा आरोपींपैकी सहा आरोपींना गजाआड केले असून इतर आरोपींचा देखील पोलिसांकडून शोध सुरू आहे.या गुन्ह्यातील आरोपी पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथील असून या आरोपींनी पाथर्डी शेवगाव तालुक्यामध्ये मोठा धुमाकूळ घातलेला असून पोलिसांनी यातील काही आरोपींना अटक केल्यानंतर या आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. तिसगावच्या दरोड्यातील आरोपींना अटक झाल्याने व पोलिसांनी शब्द दिल्याप्रमाणे दोन दिवसात आरोपींना गजाआड केल्याने पोलिसांच्या कार्य तत्परतेचे स्वागत तिसगाव ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून व तिसगावकरांच्या भावना लक्षात घेता माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पोलीस अधीक्षक राकेश ओला,उपाधीक्षक प्रशांत खैरे,डीवायएसपी सुनील पाटील,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख दिनेश आहेर,पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांच्या संपूर्ण टीमचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे,पुरुषोत्तम आठरे,सुनील परदेशी,विक्रम ससाने,भाऊसाहेब लोखंडे,सरपंच इलियास शेख यांच्यासह तिसगावच्या सर्व ग्रामस्थांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.

प्रतिनिधी :– भिवसेन टेमकर Ntv न्यूज मराठी पाथर्डी,अहमदनगर.मो.नं.9373489851.