♦️दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (ता. १३) निर्णय दिला. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. यामुळे केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी त्यांना ईडी खटल्यातही जामीन मंजूर झाला होता.


♦️सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना त्यांना काही अटी घातल्या आहेत. त्यांनी या खटल्याबद्दल कोणतेही सार्वजनिकरीत्या भाष्य करु नये आणि जोपर्यंत सूट दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना ट्रायल न्यायालयासमोरील सर्व सुनावणींना हजर राहावे लागेल, या अटींवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.