(सचिन बिद्री :उमरगा धाराशिव)

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरासह उमरगा-लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या जिवाळ्याशी निगडित मूलभूत समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा 17 सप्टेंबर रोजी भव्य स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी निवेदनाद्वारे प्रशासनास दि 12 रोजी विनंती केली आहे.
उपविभागीय अधिकारी गणेश पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,16 सप्टेंबर पर्यंत समस्या सोडवण्यात आल्या नाहीत तर 17 सप्टेंबर रोजी लाक्षणिक उपोषण सुरु करणार.उमरगा व लोहारा तालुक्यातील ज्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे त्या विविध समस्या पुढील प्रमाणे…
1) उमरगा शहरांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था करावी.
2) शहरातील विविध भागातून गटारीचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर येत असल्याने ते पाणी रस्त्यावर साचून डबकी तयार झाली आहेत. त्यामध्ये डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे बंदिस्त गटारी करून पाण्याची विल्हेवाट लावावी.
3) उमरगा शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत त्या कचऱ्याची तात्काळ विल्हेवाट लावावी.
4) उमरगा शहरांमध्ये व संपूर्ण उमरगा व लोहारा तालुक्यामध्ये विजेचा सतत लपंडाव होत असतो. सतत वीज जाण्याने नागरिकांना डासांचा त्रास होत असून चोऱ्यांचे प्रमाणही अफाट वाढले आहे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होणार नाही याची सूचना संबंधित विभागाला द्यावी.
5) शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे शेतीसाठी दिवसा बारा तास अखंडितपणे वीज पुरवावी जेणेकरून पिकांना पाणी तर देता येईलच शिवाय दिवसा लाईट चालू राहिल्यामुळे रात्रीचा धोका टळेल.
6) उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध बँकांकडून शेतकऱ्यांना सिबिल स्कोर चांगला नाही म्हणून पीक कर्ज दिले जात नाही. कोणत्या बँका कर्ज देत नाहीत त्या बँकांच्या शाखाधिकार्‍यावरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत व शेतकऱ्यांचे पीक कर्ज तात्काळ मंजूर करण्याविषयी आदेशित करावे.
7) उमरगा शहरांमध्ये पावसाळ्यामुळे अनावश्यक गवत भरमसाठ वाढले आहे त्याचे तात्काळ निर्मुलन करण्यात यावे.
8) घाणीमुळे गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन नुकतेच दोन बालकांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला, याचे गांभीर्य लक्षात घेऊन डासांचा नायनाट करण्यासाठी उमरगा व लोहारा तालुक्यातील प्रत्येक गावात तात्काळ उपाययोजना आखन्यात याव्या.
9) उमरगा व लोहारा शहरातील मोकाट जनावरांचा वाहतुकिला अडथळा तर होत आहेच शिवाय झाडांची नासधुसही होत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे त्यांना गोशाळेमध्ये दाखल करा किंवा अन्यत्र व्यवस्था करावी.
या निवेदनावर दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक तथा सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *