♦️माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. काही दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत संगमनेर किंवा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर आता पुन्हा एकदा सुजय विखेंनी संगमनेरमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची वेध लागले आहेत.


♦️महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधानसभेची जोरदार तयारी करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने निलेश लंके यांना पसंती दिली होती. यानंतर आता सुजय विखेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. सुजय विखेंनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विरुद्ध सुजय विखे पाटील यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. मला संगमनेरमधूनच विधानसभा लढवायला आवडेल. इतर मतदारसंघात नको. पक्षाने आदेश दिल्यास संगमनेर मधूनच उमेदवारी करणार आहे. मी संगमनेर मधूनच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, असे सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.