♦️गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरासह उपनगरातील २७७ जणांना २४ तासांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, यासाठी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांनी १७०, तर तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०७ जणांना हद्दपार करण्यात आले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्या हद्दीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले होते. त्यास उपविभागीय अधिकाऱ्यांकडून परवानगी देण्यात आली आहे.

♦️गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरासह जिल्ह्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मिरवणूक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.