♦️शहरातील अहमदनगर क्लब  या संस्थेची निवडणूक सोमवारी (ता. १६) बिनविरोध झाली. क्लबच्या सचिवपदी उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे बिनविरोध निवडून आले आहेत. सचिवपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. फिरोदिया हे चौथ्यांदा सचिवपदी विराजमान झाले आहेत. अहमदनगर क्लबचा द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. निवडणूक ३० सप्टेंबर रोजी नगर शहरातील अहमदनगर क्लब या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. क्लबच्या सचिवपदी उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे बिनविरोध निवडून आले आहेत. सचिवपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. फिरोदिया हे चौथ्यांदा सचिवपदी विराजमान झाले आहेत.

♦️या निवडणुकीत ३० सप्टेंबर रोजी सचिव पदासाठी नरेंद्र फिरोदिया यांचा एकमेव अर्ज आला होता. तसेच संचालकपदाच्या ११ जागांसाठी सीए अशोक पितळे, सुमतीलाल कोठारी, चेतन बोगावत, हेमेंद्र कासवा, नीलेश चोपडा, सीए प्रवीण कटारिया, अॅड. जयवंत भापकर, पवन गांधी, सत्येन गुंदेचा, आजेश धुप्पड, डॉ. रवींद्र सोमाणी या ११ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या सर्वांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अहमदनगर क्लबच्या निवडणुकीत उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे सचिवपदी विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांची सचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर सीए अशोक पितळे, चेतन बोगावत हे आठव्यांदा संचालकपदी निवडून आले आहेत. सुमतीलाल कोठारी यांची ही सातवी वेळ आहे. निवडणूक आलेल्या अकरा संचालकांपैकी डॉ. सोमाणी वगळता उर्वरीत सर्व दहा संचालक हे विद्यमान संचालक आहेत. मागील वेळी अहमदनगर क्लबसाठी निवडणूक झाली होती. यंदा मात्र निवडणूक बिनविरोध झाली. एकदा निवडणूक झाली की पुढच्यावेळी निवडणूक बिनविरोध होत असल्याचा आतापर्यंतचा इतिहास असल्याचे सांगितले जाते.