♦️जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकरभरती संशयात पद आहे. बँकेच्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी सभासद तथा विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सहकार मंत्री दिलीप वळसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


♦️निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा सहकारी बँकेने राज्य सहकारी बँकेतून मोठ्या प्रमाणात रकमा काढल्या आहेत. त्याचा या जिल्हा बँकेच्या लिक्विडिटीवर परिणाम झाला आहे, ही बाब गंभीर आहे. बँकेत होणाऱ्या ७०० पदांची भरती संशयास्पद आहे. त्यात मोठा गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. भरतीची प्रक्रिया पारदर्शीपणे होण्यासाठी वर्क वेल कंपनीस काम दिलेले आहे. या कंपनीला केवळ ७६ पदांच्या भरतीचा अनुभव आहे. त्यामुळे या कंपनीने भरती प्रक्रिया व्यवस्थित राबवली का नाही, याबाबत गांभीर्याने चौकशी होणे गरजेचे आहे, असे निवेदनात नमूद केले आहे.