♦️शेअर मार्केटच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पोलिसांनी सापळा लावून मध्यप्रदेशातून जेरबंद केले आहे. शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथील कृष्णा बाजीराव भागवत यांच्या फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली एक कोटी एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


♦️पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी कैलास दत्तात्रय भागवत (रा. एरंडगाव, ता.शेवगाव) हा इंदोर (मध्यप्रदेश) येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस पथक तयार करुन इंदोर (मध्यप्रदेश) येथे आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. तपास पथकाने इंदोर येथे जावून आरोपीस ताब्यात घेत शेवगाव पोलीस ठाण्यात आणले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.