♦️कोपरगाव शहरात काल भर रस्त्यावर दोन गटात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली होती. या गोळीबारात तन्वीर रंगरेज ही व्यक्ती गंभीर जखमी झाली. कोपरगाव शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासात वेगवान तपासाची चक्रे फिरवून दोन्ही गटाच्या आठ आरोपींना ताब्यात घेतले. पूर्ववैमनस्यातून हा गँगवॉर झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.


♦️कोपरगाव शहरात गोदावरी नदी नजीक असलेल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रानजीक गुरुवारी (ता. १९) दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास भर रस्त्यावर दोन गटात गोळीबार होऊन यात एक जण जखमी झाला होता. दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी रामनाथ गोरख मोरे (वय ३१, रा. पिंपळवाडी रस्ता, शिर्डी, ता. राहाता), अमर बाळू भोसले (वय २३, रा. प्रवरानगर, लोणी, ता. राहाता), रवी राजेंद्र बनसोडे (वय २४, रा. बाजारतळ, शिर्डी, ता. राहाता), बाळासाहेब शिवाजी पगारे (वय २५, रा. जाधव वस्ती, शिंगवे, ता. राहाता), नजीम इस्लाउद्दीन शेख (वय २६, रा. गांधीनगर, कोपरगाव), अझर इस्माउद्दीन शेख (वय २४, रा. गांधीनगर, कोपरगाव), एजाज अन्सार मणियार (वय २४, रा. गांधीनगर, कोपरगाव) व सागर रामदास मंजुळे (वय २३, रा. कोपरगाव) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.