♦️जिल्‍ह्याच्या काही भागात २३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत विजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस तसेच २६ सप्टेंबर रोजी विजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नगर जिल्‍ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्‍यात आलेला आहे.


♦️पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यात अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भीमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे जिल्‍ह्यातील भीमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.