♦️संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला शनिवारी (ता. २१) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. रवींद्र भानुदास भाग्यवान (वय ५२) असे आरोपीचे नाव आहे.


♦️आश्वी पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. त्यात तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई होणार होती. मात्र, ही कारवाई टाळण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भाग्यवान याने लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने शनिवारी (ता. २१) सापळा लावला होता. भाग्यवान याने सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती ही रक्कम नऊ हजार निश्चित करण्यात आली. ही रक्कम स्वीकारताना पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पथकाने आश्वी पोलीस ठाण्यात भाग्यवान याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.