लातूर प्रतिनिधी

लातूर: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिजिटल मिडिया पत्रकारांना रोजगार आणि उत्पन्नाची संधी निर्माण करुन द्यावी; अशी मागणी राजा माने,संस्थापक अध्यक्ष डिजिटल मिडिया यांनी रविवार दिनांक 22सप्टेंबर 2024 रोजी लातूर येथील विश्राम गृह येथील बैठकीमध्ये मागणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व समाज घटकांसाठी अनेक योजना राबवून इतिहास घडविल्याबद्दल त्यांचें मनःपूर्वक अभिनंदन ! लाडक्या बहिणींपासून अगदी रिक्षा व टॅक्सी चालकांपर्यंतच्या विविध घटकांसाठी आपण अनेक योजना राबविल्या आहेत. महानगरातील झोपडपट्ट्या व उच्चभ्रूवर्गापासून ते थेट राज्यातील वाड्या-वस्त्यांवर प्रभावीपणे पोहोचलेल्या डिजिटल मिडिया पत्रकारांकडे मात्र आपले दुर्लक्ष झाले आहे.

♦️देशातील अनेक राज्यांनी आपले डिजिटल मिडिया धोरण जाहीर करून डिजिटल पत्रकारांना दिशा दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दि. 28ऑगस्ट 2024 रोजी उत्तर प्रदेश डिजिटल मिडिया धोरण जाहीर करुन तिथल्या डिजिटल मिडियाला आधार दिला.राजस्थान व उत्तर प्रदेशच्या धर्तीवर त्यापेक्षाही व्यापक धोरण युध्दपातळीवर आपण जाहीर करुन त्याची अंमलबजावणी करावी, ही आमची आपणाकडे आग्रही मागणी आहे. तसेच विधीमंडळ अधिवेशनात सरकारने जाहीर केल्यानुसार वृध्द पत्रकारांना तातडीने दरमहा २० हजार रुपये सन्मान मानधन सुरु करावे.आमच्या मागण्या मान्य करुन राज्यातील पत्रकारांना आधार द्यावा, अशी मागणी वजा विनंती करण्यात आली आहे.
तसेच लातूर जिल्ह्यामध्ये डिजिटल मीडिया पत्रकारांची नवीन नोंदणी करून शासनाच्या मिळणाऱ्या विविध योजना कशा पत्रकारांना मिळतील याबाबत आपण प्रयत्न करणार असून लवकरच पत्रकारांना ओळखपत्र देण्यात येणार असल्याचे यावेळी राज्य संघटक संजय जेवरीकर यांनी मार्गदर्शन करताना संगीतले.
♦️यावेळी बैठकीमध्ये राज्य संघटक संजय जेवरीकर, दिपरत्न निलंगेकर,जिल्हाध्यक्ष हारून सय्यद,माजी जिल्हाध्यक्ष के वाय पटवेकर, बी डी उबाळे, बी जी शेख, विठ्ठल पांचाळ, महेश कोळी सह इतर पत्रकार उपस्थीत होते.