पालघर रोड वरून अद्ययावत सी सी कॅमेरा चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शाळुंके यांच्या हस्ते उदघाटन
पालघर जिह्यात झपाट्याने नागरीकरण वाढत आहे व विशेषतः बोईसर व पालघर येथील वाढलेली प्रचंड लोकसंख्या तसेच औद्योगिक वसाहतीमुळे गुन्ह्यांचे प्रकारही वाढत आहेत , यात महिलांची चेन स्नाचिंग च्या प्रकरणातही वाढ झाली आहे.बोईसर अथवा पालघर येथील गुन्हा करणारे आरोपी बोईसर – पालघर येथील मुख्य रस्ता अथवा बोईसर ओव्हर ब्रिज चा वापर करून पसार होण्यात यशस्वी होत आहे.
त्यामुळेच पालघर बोईसर येथील घडण्याऱ्या गुन्ह्याची उकल होण्यात पोलिसांना सहकार्य ह्वावे यादृष्टीने जिह्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे पालघर जिह्यातील शिवसेनेचे नेते कुंदन संखे यांच्या पुढाकारातून बोईसर पालघर मुख्य रस्त्यावर बसविण्यात आलेल्या सी सी कॅमेराचे उदघाटन बोईसर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शाळुंके यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी बोलतांना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शाळुंके यांनी कुंदन संखे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावनेतून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व घडण्याऱ्या गुन्ह्यानंतर त्याची सोडवणूक ह्वावी याकरिता पोलीस प्रशासन व जनतेला सहकार्य ह्वावे यादृष्टीने घेतलेल्या पुढाकाराबाबत आभार व्यक्त केले तर कुंदन संखे यांनी सामाजिक व राजकीय जीवनात वावरतांना जनतेच्या दृष्टीकोनातून भूमिका बजावणे हे आपले कर्तव्यच असल्याचे व यापुढेही ते सदैव सुरू राहणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विद्या नगर मंडळाचे अध्यक्ष मनोहर चुरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख वैभव भोईर, ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ संखे,किरण महाले,संजय संखे, रुपेश संखे, योगेश राऊत,तन्मय संखे, गिरीश शिंदे, ऍड. तृप्ती संखे,कैलास नाईक, प्रणित संखे उपस्थित होते.