मान्यवरांनी संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले
गडचिरोली : आष्टी शहरा जवळ असलेल्या ईलूर येथे वीर बाबुराव शेडमाके यांचे शहीद दिन उत्साहात साजरा करण्यात आले. सदर कार्यक्रमात अध्यक्षस्थानी काँग्रेस सरचिटणीस श्री संजयराव पंदिलवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते हरीष मंगाम , सरपंच श्री तूळशिराम मडावी. उपसरपंच श्री रामचंद्र बामणकार .श्रीमती फूलाबाई मडावी .रवि बामणकार. विजय दूरगे आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय स्थानावरून काँग्रेस सरचिटणीस संजयराव पंदिलवार यांनी, वीर बाबुराव शेडमाके हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठून पेटले होते. आदिवासी समाजातील क्रांतिकारक थोर महात्म्यांनी देशासाठी किंबहुना आदिवासी समाजासाठी बलिदान व प्राणाची आहुती दिले असून अशा थोर क्रांतिकारक महापुरुषांची प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन करून आदिवासी समाजच या देशाचे मूळनिवासी असल्याने विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे म्हणत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
याचप्रसंगी ईलूर येथील संतोष मडावी. विजय मडावी. व ईलूर येथील आदिवासी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली