पालघर : जिह्यातील सामाजिक क्षेत्रात आपल्या सातत्यपूर्ण कामाच्या माध्यमातून सतत जनतेच्या प्रति आपली संवेदना जपणारे ,कोविड काळात हजारो लोकांना विविध स्वरूपाचे सहकार्य करणारे शिवसेनेचे पालघर जिह्यातील नेते यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अवयव दानाचा फॉर्म अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. संजय केळकर यांच्याकडे सुपूर्द करून सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.

आज वेगवेगळ्या गंभीर आजारातील व्यक्तींना प्रत्यारोपण करण्याकरिता अवयव न मिळाल्याने मृत्यूला सामोरे जावे लागते . समाज जरी आधुनिकतेकडे जात असला तरी अवयवदानाकरिता कोणीही पुढे येण्यास धजावत नाही. परंतु कुंदन संखे यांच्या अवयव दानाकरिता घेतलेल्या पुढाकाराने इतरांनाही प्रेरणा मिळेल व हतबल झालेल्या रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होईल असा विश्वास आरोग्य विभागाच्या पालघर जिह्याचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डाँ. संजय केळकर यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कुंदन संखे यांनी कोरोनाच्या आजाराने आपल्याला बरंच काही शिकविले असून मानवतेच्या दृष्टिकोनातून नेहमीच समाजाला दिशा देण्याऱ्या गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजेत व याकरिता अधिकाधिक व्यक्तींनी पुढे येऊन आपले सामाजिक योगदान देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.