सांगली : राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने वाळवा तालुक्यामध्ये नवनियुक्त झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार बुके नको बुक द्या या संकल्पनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या लोक माझे सांगाती हे पुस्तक व शाल देऊन करण्यात आले.

यावेळी संघटनेच्या वतीने तालुक्यातील जनसामान्यांची व सर्वसामान्य लोकांची कामे सुरळीतपणे करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नूतन प्रांताधिकारी मा.संपत खिलारी साहेब,तहसीलदार मा. प्रदीप उबाळे साहेब,इस्लामपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. वैभव साबळे साहेब तसेच पोलीस निरीक्षक मा.शशिकांत चव्हाण साहेब या नूतन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.तसेच इस्लामपूर व परिसरामध्ये विशेष आपल्या जबाबदारी बरोबर सामाजिक कार्य केल्याबद्दल उपविभागीय अधिकारी डीवायएसपी मा. कृष्णात पिंगळे साहेब यांचाही सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व अधिकाऱ्यांनी चांगल्या कामाची ग्वाही देताना पदाधिकारी व जनतेच्याही सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी पदवीधर संघाचे सरचिटणीस विशाल सुर्यवंशी, सांगली जिल्हाध्यक्ष प्रवीण डबाने,उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सदस्य संतोष चव्हाण,तालुका सरचिटणीस लखन पवार,शहर उपाध्यक्ष सौरभ जाधव,बूथ अध्यक्ष गंगाराम शिंगाडे, सुजय पोळ व इतर पदाधिकारी उपस्थित होते.