रिपब्लिकन पक्षाला श्रीरामपूर ची जागा न मिळाल्यास महायुतीचे काम करणार नाही :- सुनील साळवे
रीपाई चे वर्धापन दिनास मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार…
जामखेड :- विधानसभेचे निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने महायुतीकडे 20 ते 22 जागा मागितल्या आहेत. त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर ची जागा निश्चिती न केल्यास नगर जिल्ह्यात महायुतीचे आपण काम करणार नाही असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अहमदनगर दक्षिण प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी दिला आहे. तसेच रीपाई चे 67 व्यां वर्धापन दिनानिमित्त सातारा येथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगितले आहे.दिनांक 29 सप्टेंबर रोजी नगर दक्षिण मधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक जामखेड येथील गणेश हॉल वर संपन्न झाली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले साहेबांचे आदेशा वरून व राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या सूचनेनुसार आजची बैठक प्रभारी जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी बोलताना साळवे म्हणाले की,मागील झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला शिर्डी व सोलापूर ची जागा सोडली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड नाराजी होती. तसेच रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नाही त्याचा फटका नगर जिल्ह्यात महायुती ला बसला आहे. विधान सभेच्या निवडणुकीतही महायुती ने रीपाई च्या कार्यकर्त्यांना मान सन्मान दिला नाही तर रिपाई पक्ष वेगळा विचार करून निर्णय घेईल असं परखड मत सुनील साळवे यांनी मांडले.त्यास कार्यकर्त्यांनी प्रतिसाद दिला.प्रत्येक तालुक्यात गाव तिथे शाखा उभारून पक्षाची सभासद नोंदणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.पक्षाचे क्रियाशील सभासद वाढवणार असून पक्ष मजबूत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
यावेळी विवेक भिंगरदिवे, रवींद्र दामोदरे,गौरव मगर ,सतीश साळवे,बाळासाहेब शिंदे , विशाल घोडके, सतीश मगर आदींनी आपले विचार व्यक्त केले.
रिपब्लिकन पक्षाचे सातारा येथील वर्धापन दिनानिमित्त मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार
दिनांक 29 सप्टेंबर रोजी जामखेड येथे झालेल्या बैठकीत सातारा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वर्धापन दिनानिमित्त नगर दक्षिण मधून मोठया संख्येने कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती सुनील साळवे यांनी दिली.पक्षाचा हा 67 वा वर्धापन दीन असून केंद्रीय मंत्री ना रामदासजी आठवले साहेब मार्गदर्शन करणार आहेत. या वर्धापन दिनासाठी सौ. सिमाताई आठवले, राजाभाऊ सरोदे, पप्पू कागदे,आशोक गायकवाड
श्रीकांत भालेराव, सातारा येथील खा.उदयन राजे भोसले, शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचेसह बहुसंख्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.त्यामुळे वर्धापन दिनाचे नियोजन ही जामखेड येथील बैठकीत करण्यात आले.
यावेळी सुनील साळवे,विवेक भिंगार दिवे,रवींद्र दामोदरे,अविनाश भोसले,बाळासाहेब शिंदे,सतीश मगर,गौरव मगर ,सतीश भैलूमे, विशाल घोडके, देवा खरात, लखन भैलूमे,शिवाजी साळवे, बाबा सोनवणे,सतीश साळवे,राम साळवे,बापू जावळे,महादेव महारनवर, खंडू मोरे, आतिश शेख,शुभम ठोंबे आदी रिपाई कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
ज्येष्ठ आरपीआय नेते बुद्धवासी धरमदादा घायतडक यांना पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अहमदगर जिल्हा प्रतिनिधी
नंदु परदेशी
मो नं 9765886124