उमरखेड(ता.प्र.):-
उमरखेड शहरातील सायकल चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते त्याच सायकल चोरी गेल्याची तक्रार देण्यास सहसा कोणी जात नाही याच गोष्टीचा फायदा घेऊन सायकल चोर आपल काम सहजपणे करून मोकळे होतात परंतु दि.9 ऑक्टोबर रोजी स्थानिक गोचरस्वामी वार्ड येथील किशोर चव्हाण यांनी फिर्यादी दिल्यामुळे पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही तपासून चोराच्या मुसक्या आवळल्या व अटक केली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की उमरखेड शहरातील अनेक भागात घरासमोरील सायकलींची चोरी करून पोबारा करणारे चोर असल्याचे स्थानिक रहीवाशांचे म्हणणे होते सायकल चोरी होणारी व्यक्ती आपल्याला पोलीस स्टेशनला जावे लागू नये यासाठी फिर्याद देण्याची टाळाटाळ करीत होते परंतु 9 ऑक्टोबर रोजी गोचर स्वामी वार्डातील किशोर चव्हाण यांची त्यांच्या घरासमोरून सायकल चोरीस गेली त्यामुळे त्यांनी उमरखेड पोलीस स्टेशनला याबाबतची फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले या सोबतच चौबारा चौक येथील उमरखेड पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात आरोपी रोहन बंडू आत्तेवार वय अठरा वर्ष राहणार आंबेडकर वार्ड उमरखेड ह. मु. शिवाजी वार्ड उमरखेड हा स्वतःच्या दुचाकीवरून येऊन सायकल घेऊन जाताना निष्पन्न झाला आहे त्यास त्याच्या राहत्या घरून अटक केली असून त्यास विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी केलेली गुलाबी रंगाची सायकल जप्त केली आहे.व तसेच आरोपिने गुन्हा करतानी वापरलीले काळ्या रंगाची स्प्लेडंर जप्त केली, तसेच त्याच्याकडून शहरातील चोरी गेलेले सायकल असून एकूण आठ सायकल व मोटरसायकल सह 47 हजार मुद्देमाल मिळून आला.
सदर कारवाई मा,कुमार चिंता पोलीस अधीक्षक , मा पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक ,मा उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड ,पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ ,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे ,विष्णू राठोड ,निवृत्ती महाळनर, चालक मिराशे यांनी केली