लातूर : श्री केशवराज विद्यालयातील सभागृहात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर महानगर व जिल्ह्याची व्यापक बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकिच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शिवकुमार मुरगे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे संघटनमंत्री किरणराव भावठाणकर, राज्य विस्तारक मधुकरराव कुलकर्णी शेळगांवकर, मराठवाडा विभागाचे सहकार्यवाह राजाभाऊ खंदाडे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना भावठाणकर यांनी आगामी काळातील कार्यक्रम, संघटनात्मक बांधणी, सदस्यता अभियान, जुनीपेन्शन योजना, या विषयावर संवादसाधला. तर कुलकर्णी यांनी लातूर महानगरातील चार भागातील कार्यकारणी व लातूर जिल्ह्य़ातील दहा तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करून संघटनात्मक रचना, संघटनेत महिलांचे अस्तित्व, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमीत्त शाळांशाळामधून अहिल्यादेवींच्या कार्याची महती बालकांना सांगावी, राष्ट्र हित, समाज हित व शिक्षक हित जोपासणाऱ्या शिक्षक परिषदेच्या माध्यमातून वर्षभरात घेतल्या जाणा-या कार्यक्रमांची सखोल माहीती दिली. अध्यक्षीय समारोप करताना शिवकुमार मुरगे यांनी शासनाकडून केवळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-याच्या बाबतीत अन्याय करीत असल्याची खंत व्यक्त केली. त्यातही सन 2005 पूर्वी नियुक्त व सन 2005 ला अनुदान टप्यावर असलेले पण नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या संस्थेतील कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत शिक्षक परीषद कधीही गप्प बसणार न सून माजी आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंके, राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू हे सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. मंचावर जिल्हा कार्यवाह दत्तात्रय पाटील , महानगर अध्यक्ष वेणुनाथ यादव, कार्यवाह राम जोशी उपस्थित होते. याप्रसंगी नवनियुक्त पदाधिका-यांचा व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर शिरुरे व कार्यवाह तथा राज्य कोषाध्यक्ष गोविंद कोलपुके यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकिस तालुक्यातील अध्यक्ष , कार्यवाह व महानगरातील चारही विभागातील पदाधिकाऱी, जिल्हा पदाधिकाऱी मोठ्या संख्येने उपस्थित होते.