आमदार किशोर आप्पा पाटील यांचा आदिवासी समाजातर्फे करण्यात आला जाहिर निषेध

: जळगाव :

♦️पाचोरा उप विभागीय अधिकारी कार्यालय येथे धडकलाआदिवासी एल्गार मोर्चा धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामधे शामील करण्यात येऊनये आणि आदिवासी समाजाचे आरक्षण इतर कोनत्याही समाजाला उप वर्गीकरण करुन देऊनये या साठी धनगर आरक्षण विरोधामधे पाचोरा येथे आदिवासी समाजातर्फे मोठा एल्गार मोर्चा काढण्यात आला जर धनगर समाजाला आदिवासी जमातीमधे आरक्षण देण्याचा प्रयत्न शासनाने केला तर आदिवासी समाजातर्फे मोठा उद्रेक निर्माण होईल आणि याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकार जबाबदार राहील असा इशारा आदिवासी समाज व संघटने तर्फे देण्यात आला महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद या संघटना तर्फे पाचोरा येथे काढण्यात आलेला धनगर आरक्षण विरोधामधे हा मोर्चा होता.

♦️सद्याला महाराष्ट्रा मधे एकीकडे धनगर समाज आदिवासी प्रवर्गामधे शामील होण्यासाठी आंदोलन करित आहे तर दुसरीकडे त्यांना आदिवासी समाजातर्फे पुर्ण विरोध केला जात असुन या संदर्भामधे आदिवासी समाज पुर्ण महाराष्ट्र भर आक्रमक होऊन ठिक ठिकाणी दररोज एल्गार मोर्चे जन आक्रोश मोर्चे आणि आंदोलन तसेच रस्ता रोको करित आहे आदिवासी समाजामधे कोनत्याही समाजाची घुसखोरी सहन केली जानार नाही असा इशारा आदिवासी समाजाच्या संघटनांनी दिला आहे.तसेच भडगाव पाचोरा विधानसभा मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी धनगर समाजाला आरक्षण संदर्भामधे जाहीर पाठिंबा दिला असल्याचे आदिवासी समाजातर्फे सांगण्यात आले त्यामुळे आदिवासी समाज तसेच आदिवासी संघटना आक्रमक होऊन आमदार किशोर पाटील यांचा कडाडून जाहीर निषेध केला आणि येत्या विधानसभा निवडणूक मधे आमदार किशोर पाटील यांना धडा शिकवनार अशी प्रतिक्रीया आदिवासी संघटना व समाजातर्फे देण्यात आल्या.

♦️आज पर्यंत आदिवासी समाजाने किशोर पाटील यांना मतदान करुन निवडुन आनण्यामधे मोलाचा सिंहाचा वाटा होता परंतु आदिवासी समाजासोबत विश्वासघात करुन आदिवासी समाजाच्या पाठिमधे खंजीर खुपसल्याचा प्रकार केला आहे त्यामुळे या येना-या विधानसभा निवडणूक मधे नक्कीच आदिवासी समाज किशोर आप्पा पाटील यांना मतदानाचा अधिकार बजावुन नक्कीच धडा शिकवनार असे वक्तव्य संघटनेचे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी केले. तसेच सिल्लोड माजी नगर अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते बनेखा पठाण यांनी तर थेट शिंदे सरकार,भाजप सरकार विरुध्द आक्रमक भुमीका घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सभे दरम्यान चांगला खरपुस समाचार घेऊन जाहीर निषेध करुन भाषनाच्या माध्यमातु चांगलाच हल्ला बोल केला होता हे सरकार जातीवादी असल्याचे ही बनेखा पठाण यांनी बोलताना सांगितले .उप विभागिय अधिकारी पाचोरा यांना निवेदन देऊन यांच्या माध्यमातु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्य शासनाला निवेदन देण्यात आले या मागणी मधे मुख्य मागणी म्हनजे धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गामधे शामील करण्यात येऊनये तसेच ब-याच शा मागण्या या एल्गार मोर्चा च्या माध्यमातु आदिवासी समाज बांधवांच्या होत्या या एल्गार मोर्चामधे हजारोंच्या संख्येने आदिवासी समाज बांधव व महिला भगिनी एकवटले होते या मोर्चा ला पाचोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यावेळेस प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी,माजी.नगर अध्यक्ष सिल्लोड बनेखा पठाण,प्रदेश उप अध्यक्ष जब्बार तडवी,प्रदेश सल्लागार समीर तडवी,सिकंदर तडवी,काशिनाथ तडवी, भिकन तडवी,युसुफ तडवी, अफसर तडवी,जाफर तडवी शेरखा तडवी.जब्बार शाम्मद तडवी,जमील तडवी,भुराज तडवी,रशिद तडवी, नसरुद्दीन तडवी, मुकद्दर तडवी,इरफान तडवी, शरिफ तडवी,पाश्शु तडवी ,असे हजारोंच्या संख्येने आदिवासी सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी,व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या मोर्चाला इतर आदिवासी संघटनांनी पाठिंबा देत सर्वच आदिवासी बांधव मोर्चामधे शामील होते.

N TV न्युज मराठी रिपोर्टर जब्बार तडवी जळगाव