सचिन बिद्री :उमरगा.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर च्या मार्च एप्रिल 2024 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये पदव्युत्तर परीक्षेत एम ए इतिहास या विषयात संपूर्ण विद्यापीठात प्रथम येण्याचा मान धाराशिव जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे एम ए इतिहास द्वितीय वर्ष वर्षात शिकत असलेल्या शुभांगी सीतापुरे हिने पटकावला आहे.
विद्यापीठ परीक्षेत एम. ए. इतिहास विषयात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना सौ. करूना ज्ञानेश्वर चापोलीकर मेमोरियल हे रुपये दोन हजार आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक दिले जाते.
सदर पारितोषिक कु.शुभांगी सीतापुरे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय अस्वले यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, इतिहास विभागाचे विभाग प्रमुख डॉ.गिरीधर सोमवंशी, डॉ. बी जी माने, प्रा. संग्राम जाधव, प्रा. पंढरीनाथ बनसोडे इत्यादी उपस्थित होते.
या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल शिवाजीराव मोरे, उपाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे, सरचिटणीस जनार्दन साठे, सचिव पद्माकरराव हराळकर, सहसचिव डॉक्टर सुभाष वाघमोडे आणि सर्व संचालक, प्राध्यापक यांच्या वतीने शुभांगी सीतापपुरे अभिनंदन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *