उमरगा :सचिन बिद्री
उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचे उमेदवार प्रविण स्वामी यांनी मंगळवारी (ता.२९) रोजी ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला.

प्रारंभी शहरातील हुतात्मा स्मारकापासून महादेव मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राष्ट्रीय महामार्गावर तहसील कार्यालयापर्यंत ढोल ताशाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली होती. यानंतर पतंगे कॉर्नर येथे भव्य जाहीर सभा झाली.
यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण स्वामी , बाबा पाटील, आश्लेष मोरे ,अजित चौधरी डॉ. अजिंक्य पाटील, रणधीर पवार, रज्जाक अत्तार, बसवराज वरनाळे, विजयकुमार नागणे, महावीर कोराळे, सिद्धाराम हत्तरगे, श्यामसुंदर तोरकडी, विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले दिलीप भालेराव, प्रकाश अष्टे, विजय वाघमारे,दिपक जवळगे,विजय दळगडे ऍड अशोक पोतदार, ऍड एस पी इनामदार, ऍड दिलीप सगर, संजय पवार, चंद्रकांत साखरे, राजेंद्र समाने, सुधाकर पाटील, डी के माने, अमोल बिराजदार, मधुकर यादव, अर्जुन बिराजदार, आदि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
