दौंड विधानसभा निवडणुकीत महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यावतीने अधिकृतपणे उमेदवारी अर्ज वीरधवल जगदाळे यांनी दाखल केला होता परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने दौंडमध्ये महायुती आता भक्कम स्थितीत असून महायुतीच्या वतीने मी अजित पवार आणि महायुतीतील सर्वच प्रमुख नेत्यांचे आभार व्यक्त करतो असे महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी सांगितले आहे
दौंडमध्ये वीरधवल जगदाळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महायुतीमध्ये आता अधिक भक्कमपणा येणार असून आम्ही या निवडणुकीला ताकतीने सामोरे जाऊ आणि विजय हा आमचा निश्चित असेल असे त्यांनी सांगितले आहे जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राहुल कुल यांनी महायुती मधील सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत.