section and everything up until
* * @package Newsup */?> शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न | Ntv News Marathi

शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम खूप उत्कृष्ट : माजी आमदार अरुण जगताप

नगर – राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी नगर शहराच्या विकासासठी आ.संग्राम जगताप यांनी सुचवलेल्या सर्व विकासकामांना मंजुरी देत खूप मोठा निधी दिला आहे. आ.संग्राम जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला आहे. या निवडणुकीत महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे खूप सहकार्य होत आहे. नगर शहरातील गोरगरीब कुटुंबीयांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी शहरातील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे खूप उत्कृष्ट काम चालू आहे. या मदत कार्यातून गोरगरिबांचे आशीर्वाद मिळत आहेत. हे काम असेच अखंडितपणे चालू ठेवा, असे प्रतिपादन माजी आमदार अरुण जगताप यांनी केले.

        शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात अरुण जगताप यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी अरुण जगताप यांचा सत्कार करून स्वागत केले. यावेळी जिल्हाप्रमुख बाबूशेट टायरवाले, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख  रणजितसिंह परदेशी, जिल्हा समन्वयक संदीप सप्रे, जिल्हाप्रमुख मंगेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख काका शेळके, ओंकार शिंदे, अंबादास कराळे, शहर प्रमुख रोहित लोखंडे, विपुल शेटीया, डॉ.विजय भंडारी व शहरातील सर्व उपशहर प्रमुख,  समन्वयक, पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख अनिल शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने नगर शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे काम चांगल्या प्रकारे चालू आहे. सर्व पदाधिकारी नागरिकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात. याबद्दल वैद्यकीय पक्षाचे कौतुक. विधानसभा निवडणुकीसाठी आता थोडे दिवस बाकी आहेत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रचार करून आ. जगतापांना जास्तीत जास्त मतदान घडवून आणा. प्रास्ताविकात जिल्हा संपर्कप्रमुख रणजीतसिंह परदेशी यांनी वैद्यकीय कक्षाची माहिती देताना पक्षाचे काम कशाप्रकारे चालते व नगर शहर व सर्व तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांचे हॉस्पिटलची बिलं कक्षाच्या माध्यमातून कमी करून रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *