शेख नावेद यांची मुख्यमंञी यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे मागणी
फुलचंद भगत
वाशिम:-विधान परिषद सदस्या भावनाताई गवळी म्हणजे सब का साथ,सब का विकास या वाटेवरून प्रवास करतांना सर्वजातीधर्माची मंडळी त्यांच्या मायाळू कारकीर्दीच्या पंखाखाली एकवटली आहे, भावनाताईला वगळून वाशिम जिल्ह्यातील विचार करणे अशक्य, त्यांचं नाव विजयाचा पासवर्ड आहे, ताई लोकनेत्या आहेत, सर्वसामान्य मतदार ही त्यांच्या आजतागायतच्या कारकीर्दीची शिदोरी आहे.वाशिम जिल्ह्याच्या शिल्पकार भावनाताई गवळी यांची अल्पकाळात विधानसभा निवडणुकीत मिळविलेली लोकप्रियता व प्रचंड प्रमाणात मिळवलेले मतदान लक्षात घेता तसेच त्यांचा जनसंपर्क ,पक्षसंघटनकार्य व विकासकामाबाबतची असणारी धडपड लक्षात घेता वाशिम जिल्हा व रिसोड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात घेण्यात यावे. राज्यात महायुतीची सत्ता आली असून लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बरेच मंत्रिमंडळाची निवड केली जाणार आहे. राज्याच्या होणाऱ्या मंत्रिमंडळात वाशिम जिल्ह्याला मंत्रीपद मिळावे अशी इच्छा नागरिकांची असतांना तसेच लाडक्या बहिणीमुळे सत्तेत आलेल्या युती सरकारच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण म्हणून भावनाताई गवळी यांना महिलाचे प्रतिनिधित्व म्हणून मंत्रीपद देण्यात यावे. सतत पाच वेळा खासदार राहिलेल्या भावनाताई गवळी यांचा सततचा पाठपुरावा हा लक्षात घेता वाशिम जिल्ह्याला प्रतिनिधित्व म्हणून त्यांना मंत्रीपद मिळावे. तसेच त्यांना देण्यात येणारे मंत्रीपद हे लाडक्या बहिणीचे प्रतिनिधित्व राहणार हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणीला भावनाताई गवळी यांना मंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख नावेद शेख यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्यमंञी यांचेकडे केली आहे.