section and everything up until
* * @package Newsup */?> पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत 'महाराष्ट भुषण' व राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्काराने सन्मानित | Ntv News Marathi

फुलचंद भगत
वाशिम:-वाशिम जिल्ह्यातील नामांकित आणी सर्वपरिचित असलेले आपल्या लेखणीने आणी समाजपयोगी कार्यामुळे गरीबांच्या गळ्यातला ताईत बनलेले सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांना विविध मान्यवरांच्या ऊपस्थीतीत पुणे येथे दि.८ डिसेंबर रोजी पुणे येथील नविपेठेतील पञकार भवन येथे ‘महाराष्ट भुषण,तर पुणे येथीलच गंजपेठ येथील ज्ञानज्योती साविञीबाई फुले सभागृहामध्ये ‘राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्काराने’सन्मानित करण्यात आले आहे.सदर पुरस्कार हा त्यांनी सहपरिवारासह स्विकारला आहे.


नेहमी सामाजीक कार्यामध्ये अग्रेसर असणार्‍या आणी पञकारीतेत अल्पावधीच नावलौकीक करणार्‍या फुलचंद भगत यांच्या पञकारीता आणी सामाजिक कार्याची दखल घेवुन कलाजीवन बहुउद्देशीय संस्था,ढगा,ता. वरुड, जि. अमरावती यांच्या प्रमुख नियोजनात फुलचंद भगत यांना
‘महाराष्ट्र भूषण अवॉर्ड २०२४’ प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटक
खासदार, सौ मेधाताई विश्रामराव कुलकर्णी (पुणे),कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अलका नाईक,कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, कवयित्री, लेखिका, समाजसेविका, मुंबई,प्रमुख उपस्थिती
डॉ. संजय गोविंदराव कुलकर्णी (सुपेकर)
महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अखिल भारतीय सकल ब्राह्मण महासंघ,प्रमुख अतिथी बाजीराव भैय्या धर्माधिकारी (मा. नगराध्यक्ष परळी वै. जि. बीड),दिपक मोरेश्वर नाईक (संपादक, अध्यक्ष आश्रय ट्रस्ट मुंबई),श्रीमती अदिती अनिल मोरये यांची ऊपस्थिती होती.हा पुरस्कार सोहळा पत्रकार भवन, गंजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे पार पडला.विशेय ऊपस्थीतीमध्ये कल्पना महेंद्र तोडेकर,मेकअप आर्टीष्ट मुंबई,


डॉ रमेशकुमार चोरकुटे (सी. ई. ओ. यहोवा यिरे फाउंडेशन चंद्रपूर) सारंग बालंखे, पुणे
हे होते.कार्यक्रमाचे आयोजन स्वागताध्यक्ष आर्टिस्ट डॉ. युवराज आनंदराव ठाकरे अध्यक्ष, कलाजीवन बहुउद्देशीय संस्था
यांनी केले.तसेच दि.८ डिसेंबर रोजी दुपारला साऊ ज्योती फाउंडेशन व सर्च फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने पुणे येथील ज्ञानज्योती साविञीबाई फुले सांस्कृतिक सभागृहामध्ये फुलचंद भगत यांना ‘राज्यस्तरीय आदर्श पञकार पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.देशाच्या प्रगतीसाठी, व राष्ट्राच्या हितासाठी सामाजिक उज्वल भवितव्यासाठी फुलचंद भगत हे पञकारीता आणी सामाजीक कार्यामधुन जनसेवा करीत आहेत.सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन दिग्गज मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजक सचिन हळदे, राहुल भाऊ निकाळजे, सत्यदिप खडसे, भारत हळदे, दिनेश गायकवाड, पवन शेळके यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ॲड. उमाकांत आदमाने यांनी केले तर कार्यक्रमाचे उद्घाटन सौ. नीलिमाताई पाटील, अन्वी अनिता चेतन घाटगे, मा. बाळराजे वाळूजकर, मा. आम्रपाली घाटगे यांनी केले.एकाच दिवशी फुलचंद भगत यांना सामाजीक कार्य आणि पञकारीतेमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वस्तरातुन कौतूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *