युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी प्रज्ञा गौतम तायडे यांची मुख्यमंञ्याकडे मागणी
फुलचंद भगत
वाशिम:-मुख्यमंञी युवा कौशल्य योजनेअंतर्गत काम करणार्या सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत सामावुन घ्यावे अशी मागणी मंगरुळपीर येथील युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी प्रज्ञा गौतम तायडे यांनी मुख्यमंञ्याकडे केली आहे.
प्रज्ञा तायडे यांनी मुख्यमंञी यांचेकडे मागणी केल्यानुसार महाराष्ट्र शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता विभागशा.नि.क्र. संकीर्ण
२०२४/प्र.क्र.९०/व्यशी-३, दि. ९ जुलै, २०२४ अन्वये.संदर्भीय शासन निर्णय अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पातळीवर सुरु केलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने” अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेली आहे व निवड झालेल्या आस्थापनेवर योजनेच्या ठराविक कालावधीत सर्व प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत.आजपावेतो प्रशिक्षण कालावधी दरम्यान प्रशिक्षणार्थींना शासकीय कामकाजाच्या विविध बाबींचे सखोल मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत आहे. या योजनेच्या माध्यमातून शासनाची कार्यप्रणाली जवळून समजुन घेण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे युवा प्रशिक्षणार्थी प्रज्ञा तायडे यांनी शासनाचे आभारही मानले आहे.या योजने अंतर्गत दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे. कारण ६ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्यांना तिथेच कायमस्वरूपी नौकरी/रोजगार मिळेल असे प्रचारार्थ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मा. कौशल्य, रोजगार, उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलेले आहे. संदर्भासाठी: https://youtu.be/q62k81MXQjMe
तसेच ९ जुलै २०२४ महाराष्ट्र शासनाच्या जी आर मधील योजनेच्या स्वरुपातील ४.५ क्रमांकाच्या मुद्यामध्ये/ओळीमध्ये लिहीलेले आहे की, प्रशिक्षण पुर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग, आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. त्यामुळे प्रशिक्षार्थीच्या संदर्भात शासनाने तसा निर्णय घेण्यासंबंधी आस्थापना यांना आदेशीत करुन न्याय देण्याची प्रक्रिया सुरु करावी म्हणजे प्रशिक्षण कालावधीला जोडुन नौकरी किंवा रोजगार देण्याच्या दृष्टीने व्यवस्था होईल असेही मागण्यामध्ये नमुद आहे.
युवा कौशल्य प्रशिक्षणार्थींच्या मागण्या
- या योजने अंतर्गत प्रशिक्षणपूर्ण झाल्यावर सर्व प्रशिक्षणार्थीचा सेवेचा कालावधी वाढवुन सर्वांना सेवेत सामावून घ्यावे. 2. प्रशिक्षण कालावधी नंतर शैक्षणिक अहर्तेनुसार शासकीय कर्मचारांच्या मुळ वेतनाच्या किमान ५०% इतके मानधन करण्यात यावे.
- शासकीय आणि निमशासकीय नौकारांना प्रासंगिक रजा, वैद्यकीय रजा आहेत त्या आम्हालाही देय असाव्यात. 4. वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून जी शासकीय नौकर भरती होते, त्या भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात तसेच अंशकालीन करण्याबद्दल विचार करण्यात यावे.
या योजनेचा हेतु यशस्वीपणे पुर्ण करून प्रशिक्षणार्थींच्या भविष्याची दिशा निश्चित करावी तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने नमुद सर्व मागण्या मंजूर करून प्रशिक्षणार्थींना न्याय मिळवुन देवून सहकार्य करावे व महाराष्ट्राला अधिक विकसित तथा गतिशील बनवण्यासाठी योगदान देण्याची संधी द्यावी अशी मागणी प्रज्ञा गौतम तायडे यांनी मुख्यमंञ्याकडे केली आहे.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206