फुलचंद भगत
वाशिम:-मुख्यमंञी युवा कौशल्य योजनेत हजारो लाडके बहिणभाऊ काम करत आहेत.येणार्या दोन महिन्यानंतर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.त्यामुळे अशा सर्व प्रशिक्षणार्थींना शासकीय सेवेत कायम करा अशा मागणीचे लेखी निवेदन मंगरुळपीर येथील तहसिलदार मार्फत मुख्यमंञ्यांना दिले तसेच ऊपविभागिय अधिकारी यांनाही लेखी निवेदन दिले आहे.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक, युवतीच्या मागण्या पुर्ण कराव्यात यासाठी युवा प्रशिक्षणार्थी आता एकञ येत आहेत.महाराष्ट्र शासन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शा.नि.क्र. संकीर्ण २०२४/प्र.क्र. ९०/व्यशी- ३ दिनांक ०९ जुलै २०२४ अन्वये
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर ६ महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच आमचे प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर कायम स्वरुपी करावे. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी केलेल्या भाषणात लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींच्या योजना आणि त्यांना दिलेली आश्वासने यांना प्राथमिकता दिली जाईल असे म्हणुन युवक आणि युवतींना आशा पल्लवीत केल्या आहेत. ह्या आशा निराशेत रुपांतरित होऊ न देता युवक आणि युवतींना कायम स्वरुपी नोकरी किंवा रोजगार उपबल्ध करुन महाराष्ट्रालाही उन्नत करावे अशी महाराष्ट्रातील युवक आणि युवतींच्या वतीने मागणी केली आहे.नियमानुसार काम आणि दरमहा किमान पाच तारखेच्या आत विद्यावेतन मिळाले पाहीजे.युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना किमान वेतन कायद्यानुसार किमान २०.०००/- वेतन/मानधन देण्यात यावे.काम करुनही दप्तर दिरंगाईमुळेच विद्यावेतन मिळत नसेल तेंव्हा दिरंगाई करण्याऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी.सहा महिण्याचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरुपी रोजगार, स्वयंरोजगार, उपलब्ध करुन दयावे. तसेच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तर, त्यांना तिथेच कायमस्वरुपी करु असे प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कौशल्यविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले आहे. त्यांनुसार प्रशिक्षणार्थीला कायमस्वरुपी करण्यात यावे.शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा वैद्यकीय रजा आहेत, त्या आम्हालाही देय असावे.वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या परिक्षा भरती प्रकीयेमध्ये प्रशिक्षणार्थीसाठी १०% राखीव जागा ठेवाव्यात.अशा मागण्यांचे लेखी निवेदन मुख्यमंञी तसेच ऊपविभागिय अधिकारी आणी तहसिलदार यांना सादर केले आहे.सदर निवेदनावर शिशुपाल भगत,शिवम रघुवंशी,प्रगती वर्मा,प्रीती सोनोने,विजेता खडसे,निता दहाञे,अक्षय राऊत,कृष्णा रघुवंशी आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206