section and everything up until
* * @package Newsup */?> नागपूर येथे २२ वे राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलन आणि भव्य पुरस्कार वितरण सोहळा | Ntv News Marathi

फुलचंद भगत
वाशिम/नागपूर : मदत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा.अँड.निल लाडे आणि संस्थापक सचिव दिनेशबाबु वाघमारे यांच्या पुढाकाराने कार्यकारिणीच्या मार्गदर्शनात,घटनाकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला सन्मान समाजसेवेचे व्रत घेतलेल्या तळागाळातील सामान्य बहुजन समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्याना मिळाला पाहीजे.बहुजनांचे सेवाव्रती कार्य जगाला माहिती होऊन,सामाजिक कार्यकर्त्याचे मनोबल उंचावण्याच्या उदात्त हेतूने संस्थापक दिनेशबाबू वाघमारे हे स्वतः तन मन धनाने सेवारत राहून दरवर्षी त्यांनी स्थापन केलेल्या मदत सामाजिक संस्थेच्या वतीने,महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सेवाव्रती कोहिनूर व्यक्तींची पुरस्काराकरीता निवड करून “राज्यस्तरीय कार्यकर्ता महासंमेलनाचे” आयोजन करीत असतात.रविवार दि. २२ डिसेंबर २०२४ रोजी श्री गुरुदेव सेवाश्रम,दिवंगत डॉ.प्रा. प्रकाशजी सोनक परिसर सभागृह नागपूर येथे २२ वे राज्यस्तरिय सामाजिक कार्यकर्ता संमेलन व भव्य पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे.या संमेलनात भारतिय संविधान व लोकशाहीच्या भवितव्याविषयी कार्यकर्त्यांची भूमिका,फुले,शाहू,आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी या विषयावर सखोल चर्चा होऊन सामाजिक कार्यकर्त्याच्या सामाजिक विकासाकरीता प्रस्ताव घेण्यात येवून शासनाला पाठविण्यात येतील. तसेच तमाम महाराष्ट्रासह भारतवर्षातील विविध कार्य क्षेत्रातील सामाजिक सेवाव्रती कार्यकर्त्याची दखल संस्थेने घेतलेली असून त्यामध्ये पात्र ठरलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे युवा पत्रकार एकनाथ पवार,अमोल अघम,समिर देशपांडे, मंगरूळपीरचे फुलचंद भगत, कारंजाचे सुप्रसिद्ध नाट्य कलावंत तथा लोककलाकार शाहिर देवमन मोरे,गजाननराव चव्हाण, मंगरूळपीर येथील सेवाव्रती कार्यकर्त्या सौ. अर्चना वाढणकर,सौ.शिला चिवरकर इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांच्या सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांना विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना संस्थेचे राज्यस्तरिय पुरस्काराचे मानपत्र,सन्मानचिन्ह, तिरंग्याची शाल व भारतिय संविधानाची प्रत देवून गौरविण्यात येणार आहे.या शाही संस्मरणिय कार्यक्रमाचे उद्‌घाटन नागपूर शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष आमदार मा. विकासभाऊ ठाकरे यांचे हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राधिकादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक मा.गीरीष पांडव, नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी अ.जा. विभाग अध्यक्ष इंजि.रूपराज गौरी हे असणार आहेत.तर प्रमुख पाहूणे उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.संजय मेश्राम, नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.अभिजीत वंजारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँक नागपूरचे अध्यक्ष मा. अनिल नगरारे,विशेष पाहुणे मा.नगरसेवक मा.मनोज साबळे, मा.नगरसेवक मा.सुभाष भोयर, मा.नगरसेवक
मा.वासुदेव ढोके, मातोश्री भागिरथाबाई शिक्षण संस्था पारशिवनी,नागपूरचे अध्यक्ष मा. उमाकांत बागडकर,मा.नगरसेवक मा.मनोज गावंडे,मा. मा.डॉ.अशोक यावले,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा जि.वाशिम अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार मा.संजय कडोळे,सुप्रसिद्ध मराठी नाट्य कलावंत मा.अशोक गवळी व उपस्थित मान्यवर तथा सर्वच पुरस्कारार्थी सामाजिक सेवाव्रती कार्यकर्ते राहणार आहेत. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते,रविवार दि.०९ : ०० राष्ट्रसंत गुरुदेव श्री. तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पण होऊन कार्यक्रमाला प्रारंभ होईल.सकाळी ०९:१५ ते सकाळी १० : ०० पर्यंत स्वागत कक्षामध्ये सामाजिक कार्यकर्त्याच्या नावांची नोंदणी होऊन त्यांना प्रवेशपत्रासह भेटवस्तू देण्यात येतील. ठिक ११:०० वाजता दिपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण,स्वागत समारंभ,स्वागत गीत तथा पाहुण्यांचा सत्कार होईल. त्यानंतर प्रमुख वक्त्याची संभाषणे व सामाजिक कार्यकर्त्यांना विविध राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. दुपारी ०२ : ०० ते ०३:०० सर्व उपस्थित पुरस्कारार्थींच्या भोजनाची व्यवस्था (स्वयंसेवा) व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर समोरोपिय संभाषणाने कार्यक्रमाची सांगता होईल.असे आयोजक अध्यक्ष अँड निल लाडे, संस्थापक सचिव दिनेश वाघमारे,उपाध्यक्ष नरेश खडसे, सहसचिव अरुण फुलझेले, कोषाध्यक्ष त्रिशरण पाटील, सदस्य धर्मेन्द्र (दामू) धनविजय, महिला सदस्या रेखाताई थूल आदींनी कळवीले आहे. असे वृत्त कार्यक्रमाचे आयोजक संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे नागपूर यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळवीले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *