यवतमाळ-दिनांक 10 डिसेंबर 2024
विद्या प्रसारक मंडळ द्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना व शारीरिक शिक्षण विभाग आणि रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रथम रक्तदान शिबिराविषयक मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा सर तर प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मिडटाऊनचे अध्यक्ष श्री जाफर सादिक गिलानी,ॲड.दिपक हिंडोचा (सचिव),तरुण हिंडोचा( प्रोजेक्ट संचालक) वसंतराव नाईक शासकीय मेडिकल कॉलेजचे डॉ. गोपी गौरव ,आशिष दाहपुते आणि संपूर्ण मेडिकल टीम, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ मीडटाऊनचे श्री निखिल जीरापुरे, श्री चारुदत्त जवारकर,श्री दिनेश वडेरा, श्री अमित मोर, श्री संजय लोहाना,श्री गोपाल बोरोडे, श्री रमेश चेदा,श्री प्रविण दर्डा,श्री दिनेश राजा इ. पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. गोपी गौरव व जाफर सादिक गिलानी,ॲड.दिपक हिंडोचा सरांनी विद्यार्थ्यांना रक्तदान विषयी मोलाचे मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. राममनोहर मिश्रा सरांनी विद्यार्थ्यांना रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असा संदेश दिला. शिबिरात एकूण 47 रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ.सरिता सिंधी,प्रा.किशोर तायडे, प्रा.कमलेश तुमसरे व स्वयंसेवकांनी कार्यक्रमास सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सचिन वानखेडे यांनी केले तसेच आभार मानले.