उमरखेड :
संपूर्ण महाराष्ट्र आज अडचणीत आहे महाराष्ट्राला लुटून सर्व उद्योग धंदे गुजरातला नेले असून खताचे भाव डिझेलचे भाव, बियाण्याचे भाव वाढवले परंतु शेतमालाचा हमीभाव वाढवला नाही शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम या भाजप सरकारने केले अशी कडाडून टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी उमरखेड येथील काँग्रेसच्या प्रचार सभेत केली
.ते उमरखेड येथील काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलत होते
यावेळी मंचावर खासदार नागेश पाटील आष्टीकर, वजाहत मिर्झा ,संदेश चव्हाण ,प्रफुल मानकर ,तातू देशमुख राम देवसरकर ,राजू भैय्या जयस्वाल, नंदकिशोर अग्रवाल ,बळीराम मुटकुळे सह महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी नाना पटोले यांनी भाजपाच्या भ्रष्टाचार प्रवृत्तीवर गणाघात केला मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणे म्हणजे भ्रष्टाचाराची परिस्थिती घातल्याचे ते म्हणाले .
यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन जुमलेबाज असल्याचे मोदी यांनी म्हणाले शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असा आरोप त्यांनी केला .
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर समृद्धी महामार्गाच्या कामाची श्वेतपत्रिका तयार करणार असल्याचे ते म्हणाले महायुतीने शेतकऱ्यांना बरबाद करण्याचे ठरवले असून शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे भाव वाढवले परंतु शेतमालाला भाव वाढवला नाही शेतकऱ्यांच्या घामाला दाम न देता जिवंत मारण्याचे धोरण भाजपाचे असल्याचे सांगत केंद्रात भाजपाची मनुस्मृतीचे सरकार आल्यावर डॉक्टर बाबासाहेबांच्या आर्थिक धोरण बदलण्यात आले व जनतेचे पैसे लुटून उद्योगपतींचे घर भरण्याचे धोरण भाजपाने अंगीकारले असून सर्व जनतेला गरीब करून गुलाम बनविण्याचे षडयंत्र भाजप सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला .
पुढे बोलताना महायुतीच्या लोकांना आपण विधानसभा हरणार असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने ते शेतकरी बेरोजगार व महागाई बद्दल न बोलता हिंदू -मुस्लिम ,हिंदू -बौद्ध हे विषय काढून द्वेष पसरवत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींना शेतकऱ्याचा घामाचा वास सहन होत नाही .
मोदींनी कोरोना भारतात आणला वैद्यकीय सुविधेपेक्षा अंधश्रद्धेवर भर दिला कोरोना काळात दिलेल्या लसीमुळे अनेकांना शारीरिक व्याधी होऊन मृत्यू होत आहेत परंतु कारवाई मात्र लस बनवणाऱ्या कंपनीवर करण्यात येते ही शोकांकिता असल्याचे ते म्हणाले .
तसेच काँग्रेसच्या इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी शहीद झाल्याचे सांगत सर्व जाती जातीत द्वेष पसरवणाऱ्या भाजप सरकारला पाडण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले .
देशाचा पंतप्रधान म्हणतात बटेंगे तो कटिंग हे दुर्दैव आहे दिल्लीतील सरकार कुबड्या घेऊन सत्तेत आहे हे सरकार लवकरच खाली
येणार अशी भविष्यवाणी नाना पटोले यांनी केली .
सभेचे सूत्रसंचालन राम देवसरकर यांनी केले तर प्रास्ताविक तातू देशमुख यांनी केले.
चौकट ।
प्रधानमंत्री विकत घेऊ शकले नाही . तर….
उमरखेड विधानसभेतील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी आमदार विजयराव खडसे अपक्ष निवडणूक लढवीत आहेत .काँग्रेसच्या तिकीट साठी ते आग्रही होते परंतु त्यांना तिकीट न देता साहेबराव कांबळे यांना तिकीट मिळाल्यानंतर विजयराव खडसे यांनी नाना पटोले यांनी पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला होता .त्यावर उत्तर देताना नाना पटोले यांनी मला पंतप्रधान विकत घेऊ शकला नाही एवढे वाक्य बोलून त्याच्याविषयी जास्त बोलणे नको असे म्हणत भाषणाचा रूख बदलला