येडशी येथे जवानांच्या उपस्थितीत होमगार्ड चा 78 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला धाराशिव होमगार्ड जिल्हा समादेशक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रनायक श्री कोकरे कॅप्टन मास्टर सुभेदार गोचडे व प्रशासकीय अधिकारी श्री सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद तालुका येडशी उपपथक समादेशक अधिकारी एम आर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वार गुरुवार दिनांक 12 12 2024 रोजी रामलिंग मंदिर देवस्थान येथे हा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य होमगार्ड वर्धापन दिन सोहळा सप्ता दिनांक 7 ते 13 डिसेंबर या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो यानिमित्ताने येडशी येथे गुरुवारी रामलिंग मंदिर परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले व दुर्गादेवी हिल स्टेशन येडशी येथे वृक्षारोपण करण्यात आले, होमगार्ड जवानांनी कोरोना काळातही कर्तव्य करून शासनाला मोलाचे सहकार्य केले कायदा व सुव्यवस्था सार्वजनिक उत्सव बंदोबस्तात होमगार्डे चांगल्या पद्धतीने कर्तव्य बजावतात या शब्दात होमगार्डच्या कार्याची प्रशासना करत सर्व मान्यवरांनी होमगार्ड जवान हे पोलिसाचे सच्चे साथीदार असल्याचे एम एस पटेल यांनी अशा शब्दात मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज देशमुख यांनी केले, तसेच पथकातील पुरुष महिला होमगार्ड यांनी उपस्थिती लाभले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव
मो.9922764189