वाशिम जिल्ह्यातून समाजसेवक तथा पत्रकार एकनाथ पवार,अमोल अघम,समिर देशपांडे,फुलचंद भगत,शाहिर देवमन मोरे,गजानन चव्हाण,सौ अर्चना वाढणकर, सौ.शिला चिवरकर इ.पुरस्कारार्थींची निवड
फुलचंद भगत
वाशिम : केन्द्र तथा महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त आणि सामाजिक न्याय विभागाच्या सामाजिक योजनांची व कार्यक्रमाची चोख अंमल बजावणी करणाऱ्या राज्यातील एकमेव अग्रणी असलेल्या, महाराष्ट्र दलित तरुण संघटना अर्थात मदत सामाजिक संस्था नागपूरच्या यंदाच्या सन 2024 च्या विविध राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा,अध्यक्ष अँड. निल लाडे आणि संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे नागपूर यांनी केलेली असून, प्राप्त माहिती नुसार वाशिम जिल्ह्यातून यावर्षी स्वतःच्या जीवावर उदार होऊन निव्वळ समाजसेवेकरीता पत्रकारिता करणार्या नामांकित युवा पत्रकारांची आणि साहित्य, कला, सामाजिक क्षेत्रातील निवडक सेवाव्रती समाजसेवकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वैदर्भिय नाथ समाज बहु.संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक नाथांजलीचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ पवार यांना महात्मा ज्योतीबा फुले समाजगौरव पुरस्कार,श्रीराम व्यायाम मंडळ कारंजाचे अध्यक्ष तथा दैनिक मातृभूमिचे शहर प्रतिनिधी अमोल अघम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार,दैनिक मातृभूमिचे तालुका प्रतिनिधी समिर देशपांडे यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार, मंगरूळपीर येथील सेवाव्रती सामाजिक कार्यकर्ते तथा धडाडीचे युवा पत्रकार फुलचंद भगत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे ज्येष्ठ लोककलावंत शाहीर देवमन मोरे यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे सक्रिय सदस्य गजाननराव चव्हाण यांना राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार,मंगरूळपीर येथील धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.अर्चना वाढणकर यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार,सुप्रसिद्ध किर्तनकार हभप.सौ. शिला चिवरकर यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न पुरस्कार जाहीर झालेला असून,येत्या रविवारी दि.२२ डिसेंबर २०२४ रोजी, नागपूर येथील श्री गुरुदेव सेवाश्रम,दिवंगत डॉ.प्रा. प्रकाश सोनक परिसर,रमण सायन्स तारांगण,शुक्रवारी तलाव नागपूर येथे राज्यस्तरिय सामाजिक संमेलनाच्या शाही समारंभात त्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष राधिकाबाई पांडव चॅरिटेबलचे संचालक मा. गिरीश पांडव, उद्घाटक नागपूर शहर काँग्रस कमेटीचे अध्यक्ष आमदार मा. संजय मेश्राम,नागपूर पदविधर विधान परिषद मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी बँकेचे अध्यक्ष मा.अनिल नगरारे,माजी नगरसेवक मा.मनोज साबळे मा सुभाष भोयर,मा.मनोज गावंडे,मातोश्री भागिरथाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.वासुदेव ढोके,श्री गुरुदेव सेवाश्रम नागपूरचे अध्यक्ष मा.अँड अशोक यावले,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार मा.संजय कडोळे,सुप्रसिद्ध मराठी नाट्य कलावंत मा.अशोक गवळी यांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.पुरस्काराचे स्वरूप महापुरुषांची प्रतिमा आणि प्रत्येक पुरस्कारार्थीच्या फोटोसह आकर्षक असे सन्मानचिन्ह असणार आहे. त्या सोबतच सन्मानपत्र,तिरंग्याची शाल आणि भारतिय संविधानाची प्रत देवून सर्व पुरस्कारार्थींना विशेष सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.असे वृत्त नागपूर येथील मदत सामाजिक संस्थेचे संस्थापक सचिव दिनेशबाबू वाघमारे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.