फुलचंद भगत
वाशिम:-माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयाचे ग्रंथालय शास्त्रावर आधारित अद्यावत व्यवस्थापन , ग्रंथालयीन सेवा आणि कामकाज त्याच प्रमाणे भविष्यातील ग्रंथालय पुढील आव्हाने ,या बाबत चे शासनाचे सहा महिन्याचे ग्रंथ पालन प्रशिक्षणाची सुविधा वाशीम करण्यात आली आहे.
सर्वसमावेशक असे हे ग्रंथ पालन प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाने नवीन सुधारित सहा महिन्याचे (जानेवारी २०२५ ते जून २०२५ ) या कालावधी करीता ग्रंथ पालन प्रशिक्षणाची निर्मिती करण्यात आली आहे . त्यामुळे हा अभ्यासक्रम माहिती तंत्रज्ञानावर आधारित असा अभ्यासक्रम राहणार आहे . या प्रशिक्षणाचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील जनतेला व्हावा या हेतूने शासनाने या प्रशिक्षणाचे वर्ग दर शनिवारी, रविवारी घेण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणाची मुख्य परीक्षा जून , महिन्यात होणार असून वाशिम येथील प्रशिक्षण केंद्रावर होणार आहे .सदर प्रशिक्षण सुरू करण्यास जिल्हा ग्रंथालय संघ, वाशिम या जिल्हास्तरीय संस्थेस नुकतीच मान्यता मिळाली आहे. वाशिम या जिल्ह्याचे ठिकाणी एकमेव प्रशिक्षण आहे . या प्रशिक्षणाचा लाभ शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार युवक ,युवती शासकीय ,निमशासकीय, कार्यालयातील कर्मचारी, शाळा कॉलेजचे कर्मचारी ,खाजगी आस्थापनेवरील कर्मचारी त्याच प्रमाणे ग्रंथप्रेमी नागरिकांना होणार आहे हे प्रशिक्षण मराठी माध्यमांमध्ये राहणार असून प्रशिक्षणाच्या प्रवेशाकरिता किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे वयाचे बंधन राहणार नाही प्रवेशाकरिता कोणतेही मूळ (ओरिजनल) शैक्षणिक प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही .या प्रशिक्षणाची एका वर्षात एकच बॅच राहणार आहे, प्रशिक्षणानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना,शाळा ,कॉलेज, सार्वजनिक ग्रंथालय ,आय टी आय, आश्रम शाळा ,केंद्रीय विद्यालय ,न्यायालय ,महामंडळ ,रेल्वे , आरोग्य विभाग , शासकीय निम शासकीय कार्यालय, आकाशवाणी ,प्रसार माध्यमे , खाजगी आस्थापना इत्यादी, मध्ये ग्रंथपाल , सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथालय लिपिक , ग्रंथालय परिसर , अभि लेखापाल ,या सारख्या पदा करिता हे प्रशिक्षणार्थी पात्र राहणार आहे. प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध होऊ शकतात सदर प्रशिक्षण श्रीमती मालतीबाई सरनाईक विद्यालय बस स्टँड समोर , वाशिम येथे दर आठवड्यातील शनिवारी व रविवारी राहणार असून या प्रशिक्षणाचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक कार्यालयीन दिवशी ठीक दुपारी १२ ते ४ या वेळेत प्राप्त होणार आहेत सदर प्रशिक्षणाचे प्रवेश अर्ज करिता इच्छुकांनी दुपारी १२ ते ४ या वेळात स्वतः प्रत्यक्ष संपर्क करून प्रवेश अर्ज प्राप्त करून प्रवेशाची आवश्यक असणारी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश घेता येईल.

या प्रशिक्षणाची प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश यानुसार प्रवेश देणे सुरू आहे करिता शाळा कॉलेजचे विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार युवक युवती स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी शासकीय निम शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी, शालेय महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी, खाजगी आस्थापनेवरील कर्मचारी त्याच प्रमाणे इतर व्यक्तींनी आणि ग्रंथ प्रेमी नागरिकांनी या प्रशिक्षणाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रशिक्षणाचे व्यवस्थापक तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथ मित्र प्रभाकर घुगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले असून अधिक माहिती करिता ७७१९०१६५२० या भ्रमणध्वनीवर सुद्धा संपर्क करण्याचे आवाहन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *