परमहंस बिरबलनाथ महाराज मंदिरात दादा हयात कलंदर यांच्या उर्सनिमित्त आलेल्या फकीर-मुर्शदांचे स्वागत
दर्ग्यात आणि मंदिरात हिंदू-मुस्लीम ऐक्याची ज्योत
फुलचंद भगत
वाशिम:-सामाजिक सलोख्याचे मुर्तीमंत ऊदाहरण मंगरुळपीर येथे पाहावयास मिळाले.मंगरुळपीर येथील दादा हयात कलंदर दर्गा आणि बिरबलनाथ मंदिरात जातीय सलोखा आणि हिंदू मुस्लिम एकतेची ज्योत आजही तेवत आहे. 23 ते 25 पर्यंत दादा हयात कलंदर यांचा उर्स संपन्न झाला.दिनांक 28रोजी दादांच्या दर्ग्यावर आलेल्या फकीर आणि मुर्शदांनी चादर अर्पण केली.त्या ठिकाणी दादाचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.ऊर्स संपल्यानंतर बिरबलनाथ महाराज ट्रस्टतर्फे दरवर्षी प्रमाण फकीरांचे स्वागत आणि सत्कार केला जातो. ही एकता कायम ठेवण्यासाठी हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या फकीरांचे दरवर्षी येथे स्वागत केले जाते. ज्याचे आयोजन मंदिर ट्रस्टने केले आहे.