फुलचंद भगत
वाशिम: समाजातील बेवारस असलेल्या वेडसर, मातिमंद,अनाथ,निराधार व्यक्तींना मायेचा आसरा देवून त्यांची स्वतःजातीने काळजी घेऊन तन मन धनाने सेवासुश्रूषा करणाऱ्या त्यांचेसाठी वाशिम येथे आपले घर या नावाने आश्रम चालविणाऱ्या अस्सल सेवाव्रती आदर्श समाजसेविका कविताताई सवाई यांचे आकस्मिकपणे,रविवार दि. 29 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे.त्यांच्या मृत्युपरांत त्यांच्या मागे दोन लहान मुले आहेत. तसेच त्यांच्या आकस्मिक मृत्युमुळे त्यांचे आश्रमातील वेडसर,मतीमंद, निराधार व्यक्ती पोरक्या झाल्या आहेत.त्यामुळे संपूर्ण कारंजा तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.कविताताई ह्या हाडाच्या समाजसेविका होत्या. त्यांच्या कडे कोणताही आर्थिक स्त्रोत नसतांना,शासनाच्या आर्थिक मदती शिवाय केवळ समाजातील थोर मनाच्या व्यक्तींच्या लोकवर्गणीतून बेघर, वेडसर,मतीमंद,अनाथ, दिव्यांग, निराधार व्यक्ती यांना आपले घर जाणवणारा आसरा देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या करीत होत्या. वेडसर अनाथांची त्या स्वतः आंघोळ घालायच्या. त्यांना स्वतः कपडे नेसवायच्या. त्यांचे कपडे स्वतः धुवायच्या. स्वतः स्वयंपाक करून त्यांना लहान मुलांप्रमाणे जेवण भरवायच्या.त्यांचा दवाखाना करून मनोरूग्न लवकर बरे कसे होतील त्याची काळजी घ्यायच्या. त्यामुळे त्यांच्या मृत्युने अनाथांची मायमाऊली आज निघून गेली आहे.त्यांच्या मृत्युची वार्ता कळताच त्यांच्या चाहत्या मंडळीनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या मृत्युने त्यांच्या परिवाराची केव्हाही भरून न निघणारी हानी झाली असून त्यांची दोन लहान मुले पोरकी झाली आहेत. त्यांच्या मृत्युची वार्ता कळताच विदर्भ लोककलावंत संघटनेचे संजय कडोळे व सर्व सदस्यांनी काळजाला धक्का देणारी दुदैवी घटना घडल्याची भावना व्यक्त करीत भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206