फुलचंद भगत
वाशिम:-महिला व बाल विकास विभागाअंतर्गंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने जिल्हयात कार्यरत असणाऱ्या बालगृहातील मुलींच्या कला गुणांना वाव मिळून त्यांचा सर्वांगिन विकास होण्याच्या दुष्टीने जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव क्रिडा स्पर्धा २०२४- २५ चे आयोजन दिनांक ०१ जानेवारी ते ०३ जानेवारी या तिन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन अहिल्यादेवी बालसदन घोट ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उदघाटन आर. आर. पाटील सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, यांच्या शुभ हस्ते करण्यात आहे.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित नितेश गोहणे सहायक पोलिस निरिक्षक घोट, प्रमुख अतिथी श्रीमती रुपाली दुधबावरे सरपंच ग्रामपंचायत घोट, श्रीमती वर्षा मनवर अध्यक्ष बाल कल्याण समिती गडचिरोली, डॉ. जितेंद्र डोव्हारे निवासी वैदयकीय अधिकारी घोट, केशव होळंबे समुपदेशक, सिस्टर मर्लीन सचिव लोकमंगल संस्था घोट, जया शेळके पोलिस उपनिरिक्षक घोट, प्रकाश भांदककर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली, विनोद पाटील जिल्हा परिविक्षा अधिकारी गडचिरोली, अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गडचिरोली, महेश रणदिवे अधिक्षक शासकीय मुलांचे निरिक्षणगृह गडचिरोली, उपस्थित होते.


सदर बाल महोत्सवात जिल्हयातील अहिल्यादेवी बालसदन घोट व मातोश्री रमाबाई मुलींचे बालगृह व निरिक्षणगृह गडचिरोली येथील प्रवेशित बालिका तसेच, स्थानिक शाळामधील पी. एम. श्री. जवाहर नवोदय विदयालय घोट, नवोदय मराठी उच्च प्राथमिक हॉयस्कुल घोट, परमपुज्य महात्मा गांधी विदयालय घोट, जि. प. महात्मा गांधी हॉयस्कुल घोट, येथील मुली व तालुकास्तरावर क्रांती ज्योती सावित्रीबाई बालसंगोपन योजनावर कार्य करणाऱ्या संस्था सुरक्षा बहुउददेशिय संस्था सिरोंचा, आरोग्य प्रबोधनी संस्था वडसा, पदमावती बहुउददेशिय ग्रामीण विकास संस्था गडचिरोली, ऑयकान बहुउददेशिय संस्था गडचिरोली, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र कोरची, आदिवासी विकास संस्था वडसा, आदिवासी विकास शिक्षण संस्था मुलचेरा मधील काळजी व संरक्षणाची गरज असणारी बालके यांचा सहभाग होता.ऊदघाटनिय कब्बडी सामना अहिल्यादेवी बाल सदन घोट व नवोदय मराठी उच्च प्राथमिक हॉयस्कुल घोट, यांच्यात चुरसिचा सामना रंगला असून कब्बडी स्पर्धेत प्रथम क्रमांक पी. एम. श्री. जवाहर नवोदय विदयालय घोट येथील मुलींनी बाजी मारली तर व्दितीय अहिल्यादेवी बाल सदन घोट येथील बालीका यांनी पटकावला. कार्यक्रमाचे संचालन जयंत जथाडे सामजिक कार्येकर्ता यानी केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गंत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *